International Yoga Day 2024 | अनंतराव पवार महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा
Anantrao Pawar College – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘योग प्रात्यक्षिका’चे आयोजन करण्यात आले होते. २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ ही संकल्पना घेऊन हा दिवस महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी नियमितपणे योग करण्याची प्रतिज्ञा घेतली. (International Yoga Day)
या दिनाच्या निमित्ताने आयोजित योग प्रात्यक्षिकावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी आपल्या जीवनामध्ये योग कशाप्रकारे महत्त्वाचा आहे हे सांगितले. स्वतःबरोबरच कुटुंबासाठीही योग महत्त्वाचा आहे हे सांगताना आपल्या वैयक्तिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक, आत्मिक समाधानाची पूर्ती देखील योगसाधनेमधून होत असते, हे यावेळी नमूद केले. योग हा विद्यार्थी, पालक, प्रौढ या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. या दिनाचे औचित्य साधून सर्वांनी योग करणे महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी मांडले. केवळ आजच्या दिवसापुरता योग न करता सातत्याने तो केला जावा यासाठी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालकांमार्फत योगाची प्रात्यक्षिके दिली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रा. अनिल मरे यांनी ‘आरोग्यासाठी योगसाधना’ या विषयावर व्याख्यान दिले. त्याचबरोबर आयोजित केलेल्या योग प्रात्यक्षिकांसाठी योग सा
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशा