International Right to Information Day | पुणे महापालिका साजरा करणार  “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन”! 

Homeadministrative

International Right to Information Day | पुणे महापालिका साजरा करणार  “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन”! 

Ganesh Kumar Mule Sep 25, 2024 8:44 PM

Maharashtra Gad Kille | UNESCO | महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव
Shirur constituency | शिरुर मतदार संघात २०२४ मध्ये भाजपाचा विजय निश्चित! | लोकसभा निवडणूक प्रभारी माधुरी मिसाळ यांचा विश्वास
Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 

International Right to Information Day | पुणे महापालिका साजरा करणार  “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन”!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) २८ सप्टेंबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन ” (International Right to Information Day) म्हणून साजरा करणार आहे. त्यानिमित्त प्रत्येक विभागामध्ये भित्तीपत्र लावणे, चर्चासत्र, व्याख्यानमाला इ. उपक्रम आयोजित करावेत. यासाठी येणारा खर्च खाते स्तरावर करण्यात यावा. असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात दिनांक १२ ऑक्टो २००६ पासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरिता व प्रभावी अंमलबजावणी करिता शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर “ माहिती अधिकार दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस ” माहिती अधिकार दिन ” म्हणून राज्यभर साजरा करण्यातयावा, असा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये २८ सप्टेंबर हा दिवस “ आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन ” म्हणून साजरा करण्यात यावा. त्यानिमित्त आपले विभागामध्ये भित्तीपत्र लावणे, चर्चासत्र, व्याख्यानमाला इ. उपक्रम आयोजित करावेत. यासाठी येणारा खर्च खाते स्तरावर करण्यात यावा. असे आदेश देण्यात आले आहेत.

२८ सप्टेंबर, रोजी कार्यलयीन सुट्टी असल्याने दिनांक २७ सप्टेंबर, रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा. माहिती अधिकार दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल नोडल अधिकारी तथा मुख्य कामगार अधिकारी यांचेकडे पाठविण्याची दक्षता घेण्यात यावी. असेही अतिरिक्त आयुक्तांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0