PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा २०२४ उपक्रमाचा शुभारंभ | शनिवारवाडा परिसरात स्वच्छता

Homeadministrative

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा २०२४ उपक्रमाचा शुभारंभ | शनिवारवाडा परिसरात स्वच्छता

Ganesh Kumar Mule Sep 20, 2024 7:22 PM

PMC Employees on Indore Tour |  पुणे महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी अभ्यास दौऱ्यासाठी निघाले इंदौरला!
CM Eknath Shinde | शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी | जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे | कारवाईचे दिले आश्वासन

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा २०२४ उपक्रमाचा शुभारंभ | शनिवारवाडा परिसरात स्वच्छता

 

Swachhata Hi Seva – (The Karbhari News Service) – स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरवडा अभियान राबविणेबाबत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेतर्फे आज शनिवारवाडा या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता ही सेवा २०२४ शुभारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांचे शुभहस्ते करण्यात आला. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Pune Municipal Corporation Solid Waste Management Department)

 

पुणे महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा (SHS) २०२४ अभियाना अंतर्गत स्वच्छता की भागिदारी, संपूर्ण स्वच्छता सफाई मित्र सुरक्षा शिबिर व स्वच्छ भारत दिवस साजरा करणे इ. विविध उपक्रम राबविणे विषयी कळविणेत आले आहे. यामध्ये फ्लॅशमॉब, सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, शाळा/महाविद्यालयीन विद्यार्थ्याची शैक्षणिक संस्था/ शाळा / महाविद्यालयामध्ये स्वच्छ भारत अभियानाची जागरुकता पसरविण्यासाठी कविता, निबंध, जिंगल्स, चित्रकला, पोस्टर, घोषवाक्य लेखन आणि प्रश्न मंजुषा आयोजित करणे, परिसरातील स्वच्छता करणे, प्लास्टिक कचरा गोळा करणे.
नागरिकांमध्ये जनजागृती करणे याचा समावेश आहे.

याप्रसंगी श्री. संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, श्रीमती चेतना केरूरे उपायुक्त परिमंडळ कार्यालय क्र ०५, श्रीमती श्यामलाताई देसाई, अध्यक्षा अपेक्स कमिटी. श्री. सत्या नटराजन स्वच्छता ब्रँड अँबेसेडर पुणे महानगरपालिका इतर अपेक्स कमिटी सदस्य वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह.  इतर सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरवात  महादेव जाधव स्वच्छता ब्रँड अँबेसेडर यांनी स्वच्छते बाबत गीताच्या माध्यमातून उपस्थितांचे प्रबोधन केले व स्वच्छ संस्थेमार्फत कचरा वर्गीकरण करणेबाबत पथनाट्यचे सादरीकरण केले.  श्यामलाताई देसाई, अध्यक्षा अपेक्स कमिटी यांनी सर्व आरोग्य निरीक्षक यांना प्रोत्साहन दिले तेसेच  संदीप कदम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांनी स्वच्छता ही सेवाच्या कार्यवाही बद्दल सविस्तर माहिती दिली व  पृथ्वीराज बी.पी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ)
यांनी सर्व कर्मचा-यांचे गणेशोत्सव काळात बंगल्या कामगीरी बद्दल अभिनंदन केले. स्वच्छता की भागीदारी अंतर्गत स्मार्ट मार्केट प्रोजेक्ट व आभार प्रदर्शन श्री. विक्रांत सिंग अपेक्स कमिटी सदस्य यांनी केले. कार्यक्रमाची सांगता, सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेऊन केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0