Football Tournament : जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजचा व्दितीय क्रमांक

HomeपुणेSport

Football Tournament : जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजचा व्दितीय क्रमांक

Ganesh Kumar Mule Dec 15, 2021 2:55 PM

IPL starting Match: ऋतुराज ने दमदार खेळी करत सावरले चेन्नईला
Asia cup 2023 | Asia Cup साठी भारताची क्रिकेट टीम तयार | हे असतील खेळाडू
Untold stories of Sachin Tendulkar | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर बाबतच्या या अफलातून गोष्टी तुम्हांला माहित आहेत का? जाणून घ्या 

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजचा व्दितीय क्रमांक

पुणे : डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने सिंहगड वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणावळा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला.
 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये २८ महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना खाईस्ट महाविद्यालय, वडगावशेरी व डॉ. डी.वाय पाटील महाविद्यालय पिंपरी, पुणे यांचे मध्ये झाला अटीतटीच्या लढतीत पूर्ण वेळेत ०/० असा स्कोर झाला. मॅच पेनल्टी शुटआऊट मध्ये गेली ४/३ या गोल फरकाने स्कोर झाला आणि व्दितीय क्रमांक डी. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिपरी पुणे यांनी पटकवला. या विजयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील सर, सचिव. डॉ. सोमनाथ पाटील सर, प्राचार्य डॉ. रणजित पाटील, ग्रंथपाल डॉ. बाबासाहेब शिंगाडे व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. ज्ञानेश्वर माने यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0