How to loose weight without Gym? | घरी शिजवलेले खाऊनही वजन का कमी होत नाही? जिमला न जाता वजन कसे कमी होते?
How to loose weight without Gym? | वाढलेल्या वजनाने (Weight Gaining) आजकाल बऱ्यापैकी लोक त्रस्त आहेत. फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील बरेच लोक वजन वाढीच्या समस्येने बेजार झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न देखील केले जातात. Diet केला जातो. Gym लावली जाते. भरपूर चालणं (Walking) होतं. तरी देखील वजनात फार फरक पडताना दिसत नाही. वजन कमी करण्यासाठी आपल्याला शरीराचे विज्ञान (Science of Body) समजून घ्यावे लागेल. काही मूलभूत गोष्टी (Fundamentals) शिकून घ्याव्या लागतील. आपल्या खाण्यातले शत्रू (Enemy) आणि मित्र (Friend) कोण आहेत? हे आपल्याला ओळखता यायला हवंय. हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. (How to loose weight without Gym?)
| घरी शिजवलेले खाऊन देखील वजन का कमी होत नाही?
बाहेरचे खाऊ नये, फास्ट फूड पासून दूर राहावे, घरी शिजवलेलेच अन्न खावे, याबाबत आज बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे. त्यानुसार लोक अमल देखील करत आहेत. बाहेरचे खाणे टाळत घरात शिजवलेलंच खातात. असं असलं तरी घरचे खाऊन देखील लोकांचे वजन वाढतानाच दिसत आहे. हे झालं शहरात. ग्रामीण भागात देखील अशीच समस्या आहे. यामुळे देखील लोक संताप व्यक्त करत आहेत. असं का होत असावं? याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आहारात जास्त प्रमाणात असलेले Sugar, Carbohydrates आणि Seed oil. हे आपले मुख्य शत्रू आहेत. त्यांना आधी आपल्याला आहारातून कमी करावे लागेल.
| आपल्या शरीराला कशाची आवश्यकता असते?
विज्ञानाच्या नियमानुसार आपल्या चांगल्या शरीर वाढीसाठी protein, fat आणि काही प्रमाणात carbohydrate ची आवश्यकता असते. मात्र आपण उलट करत असतो. प्रोटीन आणि चांगले फॅट कमी खातो आणि carbohydrate जास्त खातो. यामुळे शरीरात इन्सुलिन चे प्रमाण वाढत जाते. परिणामी आपले वजन वाढत राहते. याच गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला हवंय. Low carb या संकल्पनेचा वापर करत carbohydrate चे आहारातील प्रमाण कमी करायला हवंय. आहारात protein, fat चे प्रमाण वाढवायला हवंय. प्रोटीन मध्ये अंडी, मटण, चिकन, मासे, चीज, पनीर याचा वापर करायला हवाय.
| आपल्याला breakfast ची खरंच आवश्यकता असते का?
विज्ञान असं सांगतं कि आपल्याला breakfast ची मुळीच आवश्यकता नसते. दिवसातून फक्त दोन जेवण आपल्याला पुरेसे असतात. पण breakfast त्यांच्यासाठी उपयोगी असतो जे लोक कठीण काम करतात किंवा खूप hard व्यायाम करतात. कठीण कामात शेतात काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. मात्र breakfast करताना त्यात प्रोटीन असायला हवेत, याचीच काळजी घ्यायला हवीय. मात्र सर्रास घरात गोड चहा, बिस्कीट, टोस्ट, शिरा, पोहे, इडली, अशा गोष्टी breakfast म्हणून घेतल्या जातात. हेच आपले शत्रू आहेत. हेच खाणे बंद करा. यामुळे तुमचे वजन वाढतच राहणार आहे. त्यातूनच तुमचे आजार वाढणार आहेत.
| seed oil ला पर्याय काय?
आपण आपल्या घरात जे वापरतो त्यात बियाण्यांच्या तेलाचा समावेश असतो. त्यात वाईट फॅट असतात. जे शरीराला हानिकारक असतात. हेच मुख्य कारण आहे घरी शिजवलेलं खाऊन देखील वजन कमी न होण्याचं. आपण अशाच तेलात स्वयंपाक करत असतो. सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, असे तेल आपण वापरतो. पण हे वजन वाढीसाठी पोषकच आहे. मात्र याला पर्याय आहेत. ते तुम्ही वापरू शकता.
काय वापराल?
1. तूप (Ghee)
2. बटर (yellow Butter)
3. कोकोनट ऑइल (Coconut Oil)
| फळं खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते का?
फळातील साखरेने देखील वजन वाढतच राहते. आपण तोच चांगला पर्याय म्हणून पाहत असतो. पण ते ही आजकाल धोकादायक झाले आहे. कारण seasonal fruit शरीरासाठी चांगले असतात. मात्र बरीच फळं आज वर्षभर देखील मिळतात. यात साखरेचे (Fructose) चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फळे खाऊन देखील आपले वजन वाढत राहते. त्यासाठी कमी गोड असलेली आणि सिजनल फळं खायला हवीत. यामध्ये Avacado, पेरू, पपई, किवी अशा कमी गोड फळांचा समावेश करता येईल.
– व्यायाम आणि वजनाचा कितपत संबंध आहे?
आपण हे लक्षात घ्यायला हवंय कि फक्त व्यायाम करून वजन कमी होत नाही. त्याला nutrition ची जर जोड नसेल तर काहीच फायदा होणार नाही. मुळात व्यायाम हा Muscle mass वाढवण्यासाठी केला जातो. Nutrition ची त्याला जोड नसली तर कितीही हार्ड व्यायाम केला किंवा कितीही चालत राहिलात तरी वजन कमी होणार नाही. म्हणूनच ग्रामीण भागातील लोकांची देखील एवढे कठीण काम करून पोट वाढलेले दिसते. Protein आणि योग्य fat खाऊनच वजन कमी करता येते. त्याला व्यायामाची जोड दिली तर कमी कालावधीत वजन कमी होईल.
—
News Title | How to loose weight without gym? | Why does eating home cooked food not lose weight? How to lose weight without going to the gym?