Flag Hoisting | ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यात गल्लत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

Homeadministrative

Flag Hoisting | ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यात गल्लत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

Ganesh Kumar Mule Jan 27, 2025 9:02 AM

Raj Thackeray : राज्यपाल आणि संजय राऊत यांची राज ठाकरे यांनी केली नक्कल 
Savitribai phule pune university: विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा!
Governor Ramesh Bais | रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल | मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

Flag Hoisting | ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यात गल्लत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

 

Flag Unfurling – (The karbhari News Service) – ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यात गल्लत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी राज्यपाल (Governor) आणि मुख्यमंत्री (Chief Minister) यांच्याकडे केली आहे. (Republic Day)

कुंभार यांच्या निवेदनानुसार ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी ध्वजारोहणाच्या प्रक्रियेत असलेला फरक राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. दिनांक २४ जानेवारी२०२५ महाराष्ट्राच्या विधान मंडळ सचिवालयाने व दिनांक १८ जानेवारी२०२५ रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे राज्यात २६ जानेवारी २०२५ रोजी कोण, कुठे ध्वजारोहण करणार याची माहिती दिली गेली आहे. तथापि, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन असताना ‘ध्वजारोहण’ शब्दाचा वापर करणे ही एक गंभीर चूक आहे, कारण या दिवशी ध्वजवंदन केले जाते ध्वजारोहण नाही.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा दोरीद्वारे खालून वर नेला जातो आणि उघडून फडकवला जातो, याला ‘ध्वजारोहण’ (Flag Hoisting) असे म्हटले जाते. या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ‘ध्वजारोहण’ करतात, कारण देश स्वतंत्र झाला त्या दिवशी म्हणजे १५ ऑगष्ट १९४७ रोजी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपती पदाची शपथ कुणीही घेतलेली नव्हती. पंतप्रधान या दिवशी देशवासीयांना आपला संदेश देतात. असे कुंभार यांनी म्हटले आहे.

परंतु, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडा असतो, जो आधीच वर बांधलेला असतो. तो फडकल्यावर त्याला दोरीद्वारे उघडला जातो, याला ‘ध्वजवंदन’ (Flag Unfurling) असे म्हणतात. या दिवशी भारतीय संविधान लागू झाले होते, म्हणून या दिवशी राष्ट्रपती ध्वज फडकवतात.

२६ जानेवारी रोजी करावयाच्या ध्वजवंदनाऐवजी ‘ध्वजारोहण’ शब्दाचा वापर केल्याने महाराष्ट्राच्या सचिवालयातील व मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाया प्रक्रियेतील फरक आणि महत्वाचे मुद्दे समजत नसल्याचे दिसते. या चुकांमुळे राज्यभरातील अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना चुकीची माहिती दिली जात आहे, आणि हे गंभीर आहे. असे कुंभार यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच सचिवालय व मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांना या महत्त्वाच्या फरकाची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन करावे. अशीही मागणी कुंभार यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0