Sandip Khalate PMC | अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आता संदीप खलाटे!
| संदीप खलाटे यांना उपायुक्त पदावर पदोन्नती
PMC Deputy Commissioner – (The Karbhari News Service) – महापालिका सहाय्यक आयुक्त (PMC Assistant Commissioner) संदीप खलाटे (Sandip Khalate PMC) यांना सेवाज्येष्ठते नुसार उपायुक्त (पे मॅट्रिक्स- २३) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. शिवाय त्यांना अतिक्रमण विभागाची (PMC Encroachment Department) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
निवड समितीने नुकतीच खलाटे यांची उपायुक्त पदावर पदोन्नती देण्याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार हे आदेश जारी केले आहेत. दरम्यान अतिक्रमण विभागाची जबाबदारी ही उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्याकडे होती, ती काढून घेत खलाटे यांना ही जबाबदारी आता देण्यात आली आहे.
प्रशासनाच्या या निर्णयाने लेखनिकी संवर्गात आनंदाचे वातावरण आहे. उर्वरित पदोन्नत्या देखील लवकर देण्यात याव्यात, अशी मागणी कर्मचारी करत आहेत.
COMMENTS