पुणे महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्जासाठी मुदतवाढ | जाणून घ्या योजना
पुणे | महापालिकेच्या (PMC Pune) समाज विकास विभागाच्या (Social Devlopment dept) वतीने विविध योजना राबवण्यात येतात. शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील महिला, शालेय विद्यार्थी, दिव्यांग, कचरा वेचक, गुणवंत विद्यार्थी, बेरोजगार, तसेच मागासवर्गीयांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदवाढ देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने याची माहिती देण्यात आली आहे. (Pune Municipal corporation)
या योजनांमध्ये तब्बल 20 योजनांचा समावेश आहे. यंदा देखील महापालिकेकडून या योजनांचा लाभ घेण्यासाठी 25 जुलै रोजी जाहीर प्रकटन देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले होते. मात्र या कालावधीत अत्यंत कमी अर्ज प्राप्त झाले असल्याचे सांगत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
१) इ. १० वीतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसाहाय्य, २) इ. १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसाहाय्य, ३) सी.ई.टी. परीक्षेस बसण्यासाठी अर्थसाहाय्य, ४) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता सायकल सुविधा, ५) परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान, ६) उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य, ७) पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवर्गीय सेवकांचे मुलांसाठी अर्थसाहाय्य, ८) पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरावेचक
व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित कष्टकरी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसाहाय्य, ९) कमवा व शिका, १०) स्वयंरोजगारासाठी
अनुदान, ११) व्यसनमुक्तीसाठी अर्थसाहाय्य, १२) लाडकी लेक (मुलगी दत्तक) योजना, १३) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांना प्रोत्साहनपर योजना, १४) विधवा महिलांना अर्थसाहाय्य, १५) डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त माता रमाई भीमराव आंबेडकर योजनेअंतर्गत गवनि घोषित व शहरी गरीब योजनेतील पात्र ठरणाऱ्या विधवा, निराधार महिलांसाठी संगोपनकरिता अर्थसाहाय्य, १६) माता रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरांतील विधवा, परित्यक्ता, निराधार महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपनकरिता अर्थसाहाय्य, १७) झोपडी दुरुस्ती, १८) वैयक्तिक नळ कनेक्शन, १९) वैयक्तिक वीज कनेक्शन, २०) वैयक्तिक शौचालय बांधणे या योजनांचे अर्ज दि. २९ जुलै २०२२ ते दि. ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती भरणेबाबत जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते. वरीलप्रमाणेच्या योजनांकरिता दि. ३० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देणेत येत आहे. अ. क्र. १७ ते २० या योजनांची अंमलबजावणी क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली जाईल.
उपरोक्त योजनांचे वरील कालावधीत अर्ज ऑनलाइन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती भरणेत यावेत. याबाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.