Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्तांनी खातेप्रमुखांची घेतली ‘शाळा’!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (PMC Commissioner Dr Rajendra Bhosale) यांनी उपायुक्त तथा खातेप्रमुख (PMC HOD) यांची ‘शाळा’ घेतली असल्याचे पाहायला मिळाले. एक एका खातेप्रमुखाला उभे करून महापालिका आयुक्तांनी प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना धारेवर धरले. सर्वासमक्ष अशी शाळा घेतल्याने खाते प्रमुखा मात्र चांगलेच खजील झालेले पाहण्यास मिळाले. (Pune Municipal Corporation – PMC)
– महापालिका साजरे करणार अमृत महोत्सवी वर्ष!
यंदाच्या वर्षी पुणे महापालिकेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. विविध उपक्रम शिवाय नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद अशा विविध गोष्टीबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बैठक बोलावली होती. यासाठी अतिरिक्त आयुक्त, सर्व खाते प्रमुख, परिमंडळ चे उपायुक्त, सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांना बोलावण्यात आले होते.
काही अधिकारी फिल्डवर जात नाहीत
यावेळी आयुक्तांनी खातेप्रमुख यांची चांगलीच शाळा घेतली. एक एक खाते प्रमुखाला उभे करून आयुक्त माहिती घेत होते. तसेच व्यवस्थित माहिती न दिल्यास त्यांना खडसावत होते. काही विभागप्रमुख यांच्याविषयी नागरिकांच्या तक्रारी आयुक्ताकडे आल्या होत्या. यावरून संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी धारेवर धरले. काही अधिकारी फिल्ड वर जात नसल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान असे सर्वांसमक्ष आपल्याला उभे करून जाब विचारल्याने अधिकाऱ्यांना खजील व्हावे लागले.
– आपले कार्यालय स्वच्छ ठेवा
दरम्यान या बैठकीत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यांमधे मुख्यमंत्र्यांकडे आदेशानुसार १०० दिवसांचा कामाचा आराखडा करून तो पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच आपले कार्यालय स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यावर भर देण्यास आयुक्तांनी सांगितले. फाईल्स खूप दिवस प्रलंबित राहता कामा नयेत, असे आदेश आयुक्तांनी दिले. पालिकेचे अमृत महोत्सवी वर्ष चांगल्या पद्धतीने साजरे करण्यासाठी गंभीरतेने काम करा, असेही आयुक्तांनी सांगितले.
– काही खातेप्रमुख आणि अधिकारी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराज
दरम्यान महापालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर काही अधिकारी आणि खाते प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ज्युनियर अधिकाऱ्यांसमोर आपली अशी खरडपट्टी काढणे, काही अधिकाऱ्यांना आवडले नाही. आयुक्तांनी खाजगीत या गोष्टी सांगायला हव्या होत्या. असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही अधिकाऱ्यांनी सांगितले कि, आम्हाला बैठकीची ११ ची वेळ दिली होती. मात्र आयुक्त स्वतः १ वाजता आले. तोपर्यंत आम्ही बसूनच होतो. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थायी समितीच्या बैठकीच्या वेळी तर हे नेहमी होत राहते. कारण आयुक्त सर्वांना बैठकीला बोलवतात. ते सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहे आणि आयुक्त बैठकीला स्वतः १-२ तास उशिरा येतात. तोपर्यंत आम्हाला बसून राहावे लागते.
COMMENTS