BJP Mahila Morcha | भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना महिला  सुरक्षा बाबत निवेदन

HomeBreaking News

BJP Mahila Morcha | भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना महिला  सुरक्षा बाबत निवेदन

Ganesh Kumar Mule Jan 08, 2025 10:05 PM

Chitra Wagh | महिला मोर्चा ने सामान्य नागरिकांसाठी झटले पाहिजे | चित्रा वाघ
BJP Mahila Morcha | PMC Pune | बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे | हर्षदा फरांदे
BJP Mahila Morcha Pune | महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत | हर्षदा फरांदे

BJP Mahila Morcha | भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना महिला  सुरक्षा बाबत निवेदन

 

Pune Women Safety – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील विविध IT कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी काम करत आहेत. नुकतीच खराडी येथील आय टी कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचा तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांनेच अत्यंत निर्घृणपणे खुन केल्याची घटना घडली आहे. ह्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Pune CP Amitesh Kumar) यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या. (Pune News)

1) आपण शहरातील सर्व IT कंपन्यांना तातडीने स्वतंत्र महिला कर्मचारी सुरक्षा विषयक धोरण तयार करण्याबाबत निर्देश द्यावेत.

2) या कंपन्यांमधील कर्मचारी सुटण्याच्या वेळी संबंधित परिसरात महिला पोलीसांची गस्त सुरु करावी.

3) सर्व कंपन्यांच्या आवारातील CCTV यंत्रणेचे ॲाडीट करण्यात यावे व हे कॅमेरे चालू स्थितीत आहेत का? त्यांची संख्या पुरेशी आहे का? ते योग्य ठिकाणी लावले गेले आहेत का? याचा तपास करण्यात यावा.

4) या सर्व कंपन्यांना त्यांच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमध्ये पूर्ण वेळ महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश द्यावेत.

तरी  या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी. या बाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले या शिष्टमंडळात महिला शहराध्यक्ष हर्षदा फरांदे, प्रियंका शेंडगे शिंदे स्वाती मोहोळ, गायत्री खडके नेहा गोरे अश्विनी कोसरीकर,मनीषा मोरे आणि खुशी लाटे यांचा समावेश होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0