घरेलू कामगारांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न
पुणे : कामगारांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर पुराणिक व सरकारी कामगार अधिकारी चौरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक रस शाळेचे अध्यक्ष डॉक्टर डोईफोडे हे उपस्थित होते.
घरेलू कामगार कल्याण मंडळ पुनर्स्थापित करा : सुनील शिंदे
या शिबिरामध्ये पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील घरेलू कामगारांचे कामगार प्रतिनिधी हजर होते या प्रशिक्षण शिबिरांमध्ये घरेलू कामगारांच्या दैनिक समस्या व विचार करून त्या सोडण्यासाठी कार्य प्रणाली असावी. या संदर्भात चर्चा झाली करुणा का कालावधीत काळजी घेण्याविषयी स्वतःची स्वच्छता राखून काम करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये सरकारी कामगार अधिकारी चौरे साहेब यांची घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ यांच्या मार्फत सुरू असलेल्या योजनांची ही माहिती दिली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कामगार नेते सुनील शिंदे यांनी घरेलू कामगार कल्याण मंडळ पुनर्स्थापित करण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी करणे असून सरकारने आता त्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर या मंडळाचे पुनर्स्थापना करावी त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांना वेगवेगळ्या योजना मिळणे सोयीचे होईल. हे मंडळ बंद असल्यामुळे घरेलू कामगार महिला या अपेक्षित झाले असून आनंतअडचणीचा सामना त्यांना करावा लागत आहे. या शिबिरामध्ये पुणे शहरातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या घरेलू कामगार महिला प्रतिनिधी आपल्या समस्या मांडल्या. या शिबिराचे उद्घाटन याचे सूत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन एस के पळसे यांनी केले.
COMMENTS