आज पुण्यात नवे ४०२९ रुग्ण आढळले
पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (रविवार, ९ जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ४ हजार ०२९ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता १४ हजार ८९० झाला आहे.
रविवारी पुण्यात ६८८जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात १ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १२७ वर गेली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील कॉलेजेसही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. दरम्यान उद्यापासून राज्यात काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे झाले आहे.
– दिवसभरात ४०२९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ६८८ रुग्णांना डिस्चार्ज.
– 0१ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
५२६०३५
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १ ४८९०
– एकूण मृत्यू – ९१२७
– एकूण डिस्चार्ज- ५०२०१८
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- १८०१२
COMMENTS