Devendra Fadnavis | देवेंद्र फडणविसांना सागर बंगला मिळावा म्हणून आपण हे सरकार आणलं नाही | ध्येयाकडे जाताना काही तह करावे लागतात | अधिवेशनात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
BJP Adhiveshan – (The Karbhari News Service) – पुण्यातील बालेवाडीत भाजपचे राज्य अधिवेशन सुरू आहे. यामध्ये उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्दयांवर टोलेबाजी केली. अजित पवारांना भाजप सोबत का घेतले, या बाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ध्येयाकडे जाताना काही तह करावे लागतात. कधी दोन पाऊल पुढे तर दोन पाऊल मागे यावे लागते. मोदीजींच्या स्वप्नातील महाराष्ट्र आणि राष्ट्र घडवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. देवेंद्र फडणविसांना सागर बंगला मिळावा म्हणून आपण हे सरकार आणलं नाही. त्यामुळे तुम्ही किंतु परंतु मनात आणू नका. आपण एकजुटीने काम करुन आपल्याला पक्ष संघटना आणि राज्य बळकट करायचे आहे. असे आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. (Maharashtra BJP)
फडणवीस म्हणाले, आज गुरुपौर्णिमा आहे. भगवा ध्वज आपला गुरु आहे, हा ध्वज शिवाजी महाराजांचा आहे. त्याचा आपण मान राखला पाहिजे. २०१३ ला आपण असच अधिवेशन घेतलं आणि १४ निवडून आलो. या विधानसभेला महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार मी लिहून देतो. हा भाजपचा विचार गावपर्यंत पोहोचवणावर आहे. २०१९ च्या निवडणुकीत लोकांचा पाठिंबा बघितला, २०१४ लाही जनता आपल्या पाठीशी होती. २०१४ ची निवडणूक ती पक्षांविरोधात लढत होतो. फेक नॅरेटिव्ह ला आम्ही ताकद दाखवणार आहोत. आपला परावभ ०.३ टक्क्याने झाला. आपल्या १७ आणि त्यांच्या ३१ जागा आल्या आहेत. आता फक्त थोडी मेहनत करण्याची गरज आहे. त्यावेळी फेक नॅरेटिव्ह येत होता. त्याला उत्तर देऊ शकलो नाही. म्हणून कमी जागा आल्या आहेत.
आरक्षणाची सीमा वाढवण्याचा प्रयत्न अटलजींनी केला. मोदींनी देखील सीमा वाढवली. संविधानाचे आरक्षण सामान्य माणसासाठी आहे. संविधान बदलणार हा फेक नॅरेटिव्ह चालवण्यात आला. आवास योजना, मेट्रो, जल शिवार युक्त योजना त्यांनी बंद केल्या. आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली. बहिणीचा सन्मान करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या विरोधात ते कोर्टात चालले. आपली योजना आहे ती जमिनीवर उतरली पाहिजे. महाविकास आघाडीचे लोक आहेत. चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहेत. आपल्याला हि योजना अंमलात आणायची आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरा. आपल्या कार्यकर्त्यांनी लोकांना मदत करा.
आरक्षण बाबत बोलताना फडणवीस म्हणाले, समाजात आज दुफळी तयार झाली आहे. या राज्यात काही नेत्यांना वाटतं की, दुफळी करून आपल्याला फायदा मिळेल. ते पेट्रोल टाकण्याचे काम करत आहेत. निवडणुक येईल, जाईल. पण समाजातील दफळी भविष्यासाठी खूप नुकसान होईल. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. आमची तीच भूमिका आहे. १९८८ पासून अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षण सुरू केले. त्यांचा बळी गेला पण तेव्हा आरक्षण दिले नाही. आपलं सरकार आलं आणि आरक्षण दिले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का आरक्षण दिले नाही. त्यांनी सांगितले की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. पण आता मतांसाठी दुफळी निर्माण करत आहेत. सुप्रिम कोर्टात देखील आपण आरक्षण टिकवलं. पण ठाकरे सरकारने ते घालवलं. पण शिंदे सरकार आले आणि पुन्हा आरक्षण दिले. आज विविध खात्यात भरती होत आहे.
आम्ही आण्णासाहेब पाटील महामंडळ तयार केले. त्यातून १ लाख उद्योजक तयार झाले आहेत. आपल्या सरकारने सारथी सुरू केले. पण जे आंदोलन चालले आहे. माझा जरांगे पाटील यांना सवाल नाहीय. मी ठाकरे, शरद पवार, पटोले यांना सवाल आहे. त्यांनी समर्थन द्यावे. ओबीसी आणि मराठे दोघांना ते लटकवून ठेवत आहे. मला शिव्या खायची सवय आहे. पण तुमचा खोटेपणा समोर आणणार आहे. ये पब्लिक है, सब जानती है. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.