Courses for PMC Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना विविध अभ्यासक्रम करण्याची संधी! | वेतनवाढ आणि पदोन्नती साठी होणार फायदा!

HomeBreaking Newsपुणे

Courses for PMC Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना विविध अभ्यासक्रम करण्याची संधी! | वेतनवाढ आणि पदोन्नती साठी होणार फायदा!

गणेश मुळे May 18, 2024 12:12 PM

Pune PMC News | आपले विचार हीच आपली शक्ती : डॉ राजेंद्र भारूड | महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सन्मान!
PMC Retired Employees | बोनाला, महाडदळकर यांच्यासह पुणे महापालिकेचे 45 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!
International Women’s Day | पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन आणि पुणे मनपा कडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन! | लकी ड्रॉ मध्ये पाच महिलांना मिळाली भेट 

Courses for PMC Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना विविध अभ्यासक्रम करण्याची संधी! | वेतनवाढ आणि पदोन्नती साठी होणार फायदा!

Courses for PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) विविध अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून (All India Institute of Local Self Government) उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षक, एल.एस.जी.डी., एल. जी. एस. इस्टेट मॅनेजमेंट, डी. एल. जी. एफ. एम. असे अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत. 15 जून पर्यंत प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नतीसाठी फायदा होतो. याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्याचे आदेश मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.  (Pune Municipal Corporation (PMC)

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून राबवण्यात येणारे स्वच्छता निरीक्षक एल. एस. जी. डी., एल. जी.एस., इस्टेट मॅनेजमेंट, डी.एल. जी. एफ.एम. हे अभ्यासक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी संस्थेने डिझाईन केलेले अभ्यासक्रम आहेत. शासनाने कार्यान्वित केलेल्या विविध योजना राबविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. त्यामुळे संस्थेने खास महानगरपालिकामधील कर्मचाऱ्यांसाठी Holiday Batch (सुट्टीचा वर्ग) देखील नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. याचा फायदा महानगरपालिकेतील कंत्राटी व कायम असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे.

या सर्व अभ्यासक्रमांसाठी ७५% उपस्थिती अनिवार्य आहे. सर्व अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. नोंदणी पूर्ण करून संस्थेमध्ये येऊन प्रवेश निश्चित करणे विद्यार्थी यांना बंधनकारक राहील. प्रवेशाची अंतिम मुदत १५ जून २०२४ राहील. या बाबत महानगरपालिकेतील सर्व कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी संस्थेच्या पुणे केंद्रातील दूरध्वनी क्र. ०२०-२५४६१६२४, २५४६०७९३, २५४५५०९९ आणि व्हाट्सअँप नंबर ८७६७१८६११०, ९३०९९०५३२८, ८०८०६८७२९५ वर संपर्क साधल्यास सविस्तर माहिती उपलब्ध होईल.