PMC Retirement | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले सेवानिवृत्त! | साहेबराव दांडगे, नितीन उदास यांच्यासहित १७६ कर्मचारी सेवानिवृत्त 

Homeadministrative

PMC Retirement | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले सेवानिवृत्त! | साहेबराव दांडगे, नितीन उदास यांच्यासहित १७६ कर्मचारी सेवानिवृत्त 

Ganesh Kumar Mule May 31, 2025 2:28 PM

Pune Rain | महापालिका प्रशासनाने बाधित कुटुंबांचे पंचनामे लवकर करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी | डॉ. नीलम गोऱ्हे
PMC Employees Union Annual Report | पी .एम.सी एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक अहवालचे प्रकाशन! 
Pune Development Projects | पुण्यातील विकासप्रकल्पांना गती देण्याचे भाजपचे मंत्री मोहोळ आणि पाटील यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश! 

PMC Retirement | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले सेवानिवृत्त! | साहेबराव दांडगे, नितीन उदास यांच्यासहित १७६ कर्मचारी सेवानिवृत्त

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – मे, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले, अधीक्षक अभियंता  साहेबराव दांडगे, उप आयुक्त नितीन उदास यांच्यासहित १७६ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. ( Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आज (शनिवारी) पुणे महापालिका आयुक्तपदावरून सेवानिवृत्त झाले. पुणे महापालिकेच्या  ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच आयुक्तपदावरून निवृत्तीचा मान डॉ भोसले यांना मिळाला आहे.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नितीन उदास, उप आयुक्त, साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले.

सेवानिवृत्त होणारे अधिकारी दिलीप पावरा, कार्यकारी अभियंता, राजेंद्र तांबे, कार्यकारीअभियंता, निवृत्ती उतळे, उप अभियंता, हबीब सय्यद, उप अभियंता यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले. तर सेवानिवृत्त होणारे क्रीडा अधिकारी सुनिल हनवते यांनी सुंदर गझल गाऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास उपस्थित योगेश ससाणे, माजी सभासद यांनी सर्वांनी स्वतः साठी जगा, कुटुंबाला वेळ द्या, स्वतः ची पुंजी सांभाळा असे नमूद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहेबराव दांडगे यांनी पुणे महानगरपालिकेत काम केल्याबाबत समाधान व्यक्त करून सर्व सेवकांनी आपल्याला मिळणाऱ्या रकमेचे नियोजन करावे आपले आरोग्य सांभाळावे असे नमूद करून सर्वाना शुभेच्छा दिल्या.  नितीन उदास यांनी सेवानिवृत्त सेवकांना संबोधित करताना मी स्वतः आज सेवानिवृत्त होत असून मला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून सेवानिवृत्त सेवकांचा सन्मान करण्याचा योग या ठिकाणी घडवून आणला आहे. आपण सेवानिवृत्त होत असला तरी तुमची दुसरी इनिंग सुरू होत आहे. आपण नेहमी आनंदाने कामे केली पाहिजेत, कामात व्यस्त राहिले पाहिजे, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे असे सूचित केले. तसेच कामगार कल्याण विभाग करत आलेला सेवपूर्ती समारंभ हा उपक्रम स्तुत्य असल्याचे नमुद करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कदम यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: