‘जिथे गरज तिथे धीरज’ हा नारा घेऊन नगरसेवक धीरज घाटे यांची निवडणुकीची तयारी सुरु
पुणे : महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून निवडणूक रणधुमाळीला चांगलाच वेग आला आहे. मात्र प्रभागाची तोडमोड झाल्याने बरेच प्रस्थापित नगरसेवक नाराज झाले आहेत. मात्र नेहमीच नागरिकांच्या हाकेला ओ देत त्यांच्या मदतीला धावून जाणारे नगरसेवक धीरज घाटे यांनी मात्र प्रभागाच्या तोडमोडीकडे फार लक्ष न ‘जिथे गरज तिथे धीरज’ हा नारा घेऊन आपल्या कामाला सुरुवात देखील केली आहे. नेहमीप्रमाणे त्यांना नागरिकांचा तात्काळ प्रतिसाद देखील मिळू लागला आहे.
: कामातून मन जिंकणारा नगरसेवक
धीरज घाटे यांची ओळखच काम करणारा आणि गरजेला धावणारा माणूस असा आहे. त्यांच्या वाट्याला प्रभाग 17 आला आहे. प्रभागाची तोडमोड झाली असली तरीही त्यांना इतरांसारखी भीती वाटत नाही. जो नवीन भाग आपल्या प्रभागात आला आहे? तिथल्या नागरिकांशी त्यांनी संपर्क देखील सुरु केला आहे. घाटे आपल्या टीमला सोबत घेऊन नेहमीच कार्यरत असतात. तो अजेन्डा पुढे राबवत घाटे नी लोकांशी संपर्क करण्याचे काम सुरु केले आहे. सुरुवातीलाच घाटे यांनी नागरिकांची प्रत्येक मूलभूत गरज ओळखत नागरिकांना संबंधित काम करण्याऱ्या लोकांचे फोन नंबर उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार तात्काळ लोकांचा प्रतिसाद मिळणे देखील सुरु झाले आहे.
यामध्ये घाटे यांनी महापालिका संबंधित कामासाठी, आपत्कालीन परिस्थिती बाबत, आरोग्य विषयक कामाबाबत, मोफत ऍम्ब्युलन्स हवी असल्यास, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी स्वतंत्र व्यक्तींची नेमणूक केली आहे. तसेच महिला सबलीकरण, मोफत अभ्यासिका, अल्पदरात व्यायामशाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. शासकीय योजना, शिक्षण विषयक माहिती, पोलीस खात्याशी संबंधित कामकाजाबाबत देखील लोकांना स्वतंत्र व्यक्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा लाभ नागरीक घेऊ शकतील.
COMMENTS