Contributed Medical Assistance Scheme : PMC : अंशदायी वैद्यकीय सहाय योजना :  वैद्यकीय बिले सादर करताना आता ही कागदपत्रे द्यावी लागणार 

HomeBreaking Newsपुणे

Contributed Medical Assistance Scheme : PMC : अंशदायी वैद्यकीय सहाय योजना :  वैद्यकीय बिले सादर करताना आता ही कागदपत्रे द्यावी लागणार 

Ganesh Kumar Mule Feb 03, 2022 3:15 AM

PMC Employees Union | ब्रोकर नेमण्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची पुणे मनपा कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेकडे मागणी 
Health Officer : PMC : आरोग्य प्रमुख डॉ भारती यांना मुदतवाढ 
Swine Flu | PMC | शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरतोय  | ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात १५९ positive रुग्ण 

अंशदायी वैद्यकीय सहाय योजना :  वैद्यकीय बिले सादर करताना आता ही कागदपत्रे द्यावी लागणार

: गोंधळ टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे : अंशदायी वैद्यकीय सहाय योजनेअंतर्गत पुणे मनपामार्फत पुणे मनपाचे दरपत्रकानुसार वैद्यकीय बिले अदा करणेत येतात. वैयक्तीक वैद्यकीय बिले सादर करताना अनेकवेळा अंर्तरुग्ण विभागाची (I.P.D.) बिले व औषधांची बिले एकत्र सादर करणेत येतात. हा गोंधळ टाळण्यासाठी आता आजी माजी नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांना वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

: आजी माजी नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांना दिला जातो लाभ

पुणे महानगरपालिका, शिक्षण मंडळ विभाग, पी.एम.पी.एम.एल. या विभागाकडील सेवक, सेवानिवृत्त सेवक, विद्यमान सभासद व माजी सभासद, पुणे महानगरपालिका यांचे वैद्यकीय सेवा सुविधेसाठी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य कार्यालयामार्फत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या सेवक, सेवानिवृत्त सेवक, विद्यमान सभासद व माजी सभासद, पुणे महानगरपालिका यांनी पुणे मनपाचे पॅनेलवरील रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेणेसाठी रुग्णालयाचे इस्टिमेट (हॉस्पीटलचे चालू खर्चाचे अंदाजपत्रक) व आवश्यक कागदपत्रे (अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या कार्डची छायांकीत प्रत, सेवकाची चालू महिन्याची पगारपावती, ओळखपत्राची छायांकीत प्रत इ.) आरोग्य कार्यालयाकडे
सादर करुन आरोग्य कार्यालयातून रुग्णाचे नावे हमीपत्र घेवून पुणे मनपाचे पॅनेलवरील खाजगी रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. सेवक, सेवानिवृत्त सेवक यांना पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या हमीपत्रानुसार पुणे मनपाचे दरपत्रकाप्रमाणे अंतिम बिलाचे ९०% रक्कम पुणे मनपामार्फत अदा केली जाते. उर्वरीत अंतिम वैद्यकीय बीलांपैकी उर्वरीत १०% रक्कम व फरकाची रक्कम संबंधित सेवकामार्फत हॉस्पिटल प्रशासनास अदा केली जाते.
पुणे महानगरपालिकेच्या सेवक, सेवानिवृत्त सेवक, विद्यमान सभासद व मा. माजी सभासद, पुणे महानगरपालिका हे अनेकवेळा हमीपत्र न घेता खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल होतात. वैद्यकीय उपचार घेतलेनंतर स्वतः वैद्यकीय उपचारांचे संपूर्ण बिल अदा करतात. तद्नंतर सदरचे वैद्यकीय बिल प्रतिपूर्तीसाठी आरोग्य कार्यालयाकडे सादर करणेत येतात. अंशदायी वैद्यकीय सहाय योजनेअंतर्गत पुणे मनपामार्फत पुणे मनपाचे दरपत्रकानुसार वैद्यकीय बिले अदा करणेत येतात. वैयक्तीक वैद्यकीय बिले सादर करताना अनेकवेळा अंर्तरुग्ण विभागाची (I.P.D.) बिले व औषधांची बिले एकत्र सादर करणेत येतात. त्या अनुषंगाने अंशदायी वैद्यकीय सहाय योजनेअंतर्गत सर्व सभासदांना सुचित करणेत येत आहे की अंशदायी वैद्यकीय सहाय योजनेअंतर्गत वैयक्तीक प्रतिपूर्तीची वैद्यकीय बिले सादर करताना खालील नमूद केले प्रमाणे पुर्तता करुन सादर करणेत यावीत. असे आदेशात म्हटले आहे.

– वैयक्तीक प्रतिपूर्तीचे वैद्यकीय बिलांसोबत सादर करावयाची कागदपत्रे

अंर्तरुग्ण विभाग (I.P.D.)
१) आरोग्य प्रमुख यांचे नावे अर्ज
२) अंशदायी वैद्यकीय सहाय योजनेचे कार्ड – छायांकीत प्रत
३) सेवकाचे ओळखपत्र, आधारकार्ड – छायांकीत प्रत
४) रेशनकार्ड – छायांकीत प्रत
५) बँकेचे पासबुक – छायांकीत प्रत
६) हॉस्पीटल प्रशासनाकडील मूळ बिले आणि पावत्या (Detailed Original
Bill) सही व शिक्क्यांसहित
७) डिस्चार्ज कार्ड (Original) सही व शिक्क्यांसहित
८) औषध देय चिठ्ठया (Issue Memo)
बाह्यरुग्ण विभाग (O.P.D.)
१) आरोग्य प्रमुख यांचे नावे अर्ज
२) अंशदायी वैद्यकीय सहाय योजनेचे कार्ड – छायांकीत प्रत
३) रेशनकार्ड – छायांकीत प्रत
४) बँकेचे पासबुक – छायांकीत प्रत
५) सेवकाचे / सभासदाचे ओळखपत्र, आधारकार्ड – छायांकीत प्रत
६) डॉक्टरांच्या औषधांच्या चिठ्या (Original Prescription)
७) लॅब रिपोर्ट व बिले (Original)
८) औषधांची मूळ बिले
९) डॉक्टरांच्या Prescription नुसार देय कालावधीतील औषध बिले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0