Contract Empl0yees | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर  निदर्शन | E.S.I.C., बोनस सुरू करा आणि किमान वेतन 45 हजार करा

Homeadministrative

Contract Empl0yees | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर  निदर्शन | E.S.I.C., बोनस सुरू करा आणि किमान वेतन 45 हजार करा

Ganesh Kumar Mule Aug 20, 2026 9:09 PM

Sunil Shinde on Contract Employees | महापालिका अर्थसंकल्पात कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष | काँग्रेस चे स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांची टीका
Contract Employees PMC | कंत्राटी कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी मनपा ठोस पावले उचलणार – आयुक्त नवल किशोर राम यांचा ठाम शब्द
PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांना कायदेशीर हक्का पासून वंचित ठेवणार नाही |  आयुक्त नवल किशोर राम

Contract Empl0yees | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर  निदर्शन | E.S.I.C., बोनस सुरू करा आणि किमान वेतन 45 हजार करा

|कामगार संघटनांची मागणी

 

PMC Contract Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुविधा आणि बोनस तात्काळ सुरू करावेत, तसेच किमान वेतन 45 हजार रुपयांपर्यंत वाढवावे, या मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ संलग्न AICCTU च्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. (PMC Kamgar Union)

कंत्राटी कामगारांचे बंद केलेले ई.एस.आय.सी. आणि बोनस पुन्हा सुरू करावेत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणीही संघटनांनी केली.

निदर्शनात सहभागी झालेल्या कामगार संघटनांनी प्रशासनापुढे तीन मुख्य मागण्या मांडल्या.

1. पुणे मनपातील सर्व कंत्राटी कामगारांना ई.एस.आय.सी. म्हणजेच वैद्यकीय सुविधा तात्काळ सुरू करावी.
2. दरवर्षी मिळणारा बोनस बंद करण्यात आला आहे तो तात्काळ सुरू करावा.
3. महागाई आणि वाढता खर्च लक्षात घेऊन कंत्राटी कामगारांचे किमान वेतन 45 हजार रुपये करण्यात यावे.

संघटनांच्या म्हणण्यानुसार, या सुविधा मिळणे हा कंत्राटी कामगारांचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र सध्या त्या बंद असल्याने कामगारांना आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आज झालेल्या निदर्शनात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या हक्कांसाठी एकजूट दाखवत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.

कामगार नेत्यांनी यावेळी सांगितले की, कंत्राटी पद्धतीने काम करूनही कामगारांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. ई.एस.आय.सी. बंद झाल्यामुळे आजारी पडल्यास उपचारासाठी कामगारांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. त्याचप्रमाणे सणासुदीला मिळणारा बोनस बंद केल्याने कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण झाले आहे.

पुणे मनपात सफाई, आरोग्य, पथ आणि इतर विभागांमध्ये मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन कसे लक्ष देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: