PMC School Teacher | पुणे मनपाच्या शाळांमध्ये 300 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त!

Homeadministrative

PMC School Teacher | पुणे मनपाच्या शाळांमध्ये 300 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त!

Ganesh Kumar Mule Aug 21, 2026 8:05 AM

Pune PMC News | खाऊ पासून मुले वंचित राहणर नाहीत  | उपायुक्त किशोरी शिंदे यांची माहिती 
Kunbi-Maratha Reservation | PMC | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदीची माहिती घेण्यास सुरुवात
PMC Primary  Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेतील शिक्षक प्रश्नाबाबत महापालिका सकारात्मक | प्रशासन आणि पालकांची उद्या एकत्रित बैठक

PMC School Teacher | पुणे मनपाच्या शाळांमध्ये 300 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त!

| प्राथमिक- माध्यमिक विभागातील आकडेवारी; पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार

 

PMC Education Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेद्वारे संचलित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये 300 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक प्रमाणावर परिणाम होत असून भरतीची मागणी जोर धरत आहे. मुख्य सभेत नगरसेवक स्वप्नील दुधाणे यांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रशासनाने दिलेल्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. (Swapnil Dudhane NCP)

उप आयुक्त प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड माध्यम मिळून प्राथमिक विभागात एकूण 2715 शिक्षक पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या 2395 शिक्षक कार्यरत आहेत. म्हणजेच 320 पदे रिक्त आहेत.

माध्यमनिहाय आकडेवारी अशी आहे:

1. मराठी माध्यम: मंजूर 1900, कार्यरत 1788, रिक्त 112. याशिवाय 1 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत आणखी 43 पदे संभाव्य रिक्त होणार आहेत.
2. इंग्रजी माध्यम: मंजूर 598, कार्यरत 412, रिक्त 186
3. उर्दू माध्यम: मंजूर 205, कार्यरत 185, रिक्त 20. आणखी 4 पदे रिक्त होणार आहेत.
4. कन्नड माध्यम: मंजूर 12, कार्यरत 10, रिक्त 2

याशिवाय बालवाडी शिक्षिका आणि बालवाडी सेविका यांची प्रत्येकी 520, सेवक 400 आणि रखवालदार 484 पदेही मंजूर आहेत.

माध्यमिक विभागात 5 शिक्षक पदे रिक्त
उप आयुक्त माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, माध्यमिक विभागात एकूण 299 शिक्षक पदे मंजूर आहेत. त्यापैकी 131 पदे कार्यरत असून 168 पदे रिक्त आहेत.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 64 पदांपैकी प्रयोग शाळा सहाय्यक 15, मदतनीस 18, पूर्ण वेळ ग्रंथपाल 3, अर्धवेळ ग्रंथपाल 3, उप अधीक्षक 3, वरिष्ठ लिपिक 13, लिपिक टंकलेखक 20 आणि शिपाई 18 अशी पदे सध्या भरलेली आहेत. इतर पदे रिक्त आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केले की, शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या पवित्र पोर्टलमार्फत भरती केली जाते. त्यासाठीची मागणी नोंदवलेली आहे. शासनाच्या वेळापत्रकानुसार पुढील कार्यवाही होईल.

शिक्षकेतर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात येणार आहे.

2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 124 कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पुरेसे शिक्षक उपलब्ध करून दिले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शासनाचे विद्यार्थी-शिक्षक प्रमाण

शासन निर्णय 15 मार्च 2024 नुसार 1 ते 5 वी साठी 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक, 6 ते 8 वी साठी 35 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक, 9 वी ते 10 वी साठी 20 ते 60 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असे प्रमाण आहे. पदे रिक्त असल्याने हे प्रमाण राखणे आव्हानात्मक बनले आहे.

पुणे मनपाच्या 320 प्राथमिक शाळा आणि 43 माध्यमिक शाळांमध्ये एकूण 1 लाख 4 हजार 706 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी केली जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: