Tender Process : PMC : नवीन निविदा प्रक्रिया (Tender) वेळेत पूर्ण करा  : महापालिका आयुक्त विविध विभाग आणि खाते प्रमुखावर नाराज 

HomeपुणेBreaking News

Tender Process : PMC : नवीन निविदा प्रक्रिया (Tender) वेळेत पूर्ण करा : महापालिका आयुक्त विविध विभाग आणि खाते प्रमुखावर नाराज 

Ganesh Kumar Mule Apr 06, 2022 5:01 PM

Datta Bahirat | Ajit Pawar | विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी | राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता बहिरट यांची महापालिका आणि पीएमआरडीए कडे मागणी 
PMC Employees Promotion | महापालिका कर्मचाऱ्यांना सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची संधी महापालिका आयुक्त देणार का? 
Illegal Hoardings : अनधिकृत होर्डिंग वरून अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुख धारेवर  : महापालिका आयुक्तांनी शहर साफ करण्याचे दिले आदेश 

नवीन निविदा प्रक्रिया (Tender) वेळेत पूर्ण करा

: महापालिका आयुक्त विविध विभाग आणि खाते प्रमुखावर नाराज

पुणे : महापालिका आयुक्त विविध विभाग आणि विभाग प्रमुखांवर नाराज दिसून येत आहेत. कारण एखाद्या कामाची निविदा (Tender) संपून देखील संबंधित विभाग वेळेत निविदा प्रक्रिया राबवत नाहीत. साहजिकच त्याचा विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे आता आयुक्तांनी आदेश दिले आहेत कि निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.

: असे आहेत आदेश

माझे असे निदर्शनास आले आहे की, बहुतांश खात्यांमध्ये/विभागामध्ये निविदा प्रक्रिया राबविताना सदर निविदेची मुदत संपल्यानंतरही नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत नाही. त्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब होत असल्याने शहराच्या विकास कामांवर त्याचा परिणाम होत असतो. सदरची बाब प्रशासकीयदृष्टया योग्य नाही. वरील बाब विचारात घेता, असे सूचित करण्यात येते की, सर्व खाते प्रमुख यांनी जातीने लक्ष देऊन यापुढे नवीन निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    Manoj kudale 4 years ago

    धनकवडी स न 11 न्यु हिल व्हु टॅप सोसायटीत व कुमार बिल्डर यानी पुणे महानगर पालिके ची मालकी ची जागा विकली आहे

DISQUS: 0