CM Devendra Fadnavis on PMC Cancer Hospital | सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Homeadministrative

CM Devendra Fadnavis on PMC Cancer Hospital | सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ganesh Kumar Mule May 17, 2026 3:39 PM

PMC Ward 34 – Narhe Wadgaon Budruk | प्रभाग क्रमांक – ३४ –  नऱ्हे – वडगाव बुद्रुक | या प्रभागासाठी सर्वात जास्त म्हणजे २ हजार हून अधिक हरकती का आल्या? जाणून घ्या या प्रभागाची व्याप्ती आणि रचना 
Rights of Rivers Campaign | मुळा, मुठा सहित पुणे जिल्ह्यातील 7 नद्यांसाठी राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम
Old Pension Scheme | Maharashtra Cabinet Decision | राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | नोव्हेंबर २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

CM Devendra Fadnavis on PMC Cancer Hospital | सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

PMC Apulki Cancer Hospital – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्करोगाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात आणि त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही करावा लागतो. हीच बाब लक्षात घेत सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ तयार करण्यात येत असून या माध्यमातून राज्यातील रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि समन्वयित करण्यासाठी हे ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पुणे महानगरपालिका आणि आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारण्यात आलेल्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: