Pune : BJP Agitation : प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यांना पट्टी बांधून शहर भाजपचे अभिनव आंदोलन

HomeBreaking Newsपुणे

Pune : BJP Agitation : प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यांना पट्टी बांधून शहर भाजपचे अभिनव आंदोलन

Ganesh Kumar Mule Nov 09, 2021 12:33 PM

Pune BJP : पुणे शहर भाजपच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती
Pune BJP : Jagdish Mulik : १०० पेक्षा जास्त जागा जिंकू : पुणे शहर भाजपचा दावा 
Pune BJP : पुणे शहर भाजपच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती

प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यांना पट्टी बांधून शहर भाजपचे अभिनव आंदोलन

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी

पुणे – केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यापाठोपाठ देशातील अकरा राज्यांनी मूल्यवर्धित करकपात करुन नागरिकांना दिलासा दिला. परंतु केवळ हप्ता वसुली करण्यासाठी जनमताचा विश्वासघात करून राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांमध्ये स्वारस्य नसल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरचा मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) कपात करावी, एसटी कामगारांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात आणि आरोग्य विभागातील भरती परीक्षांमधील अनागोंदी कारभारावर नियंत्रण आणावे या मागण्यांसाठी शहर भाजपच्या वतीने आज महात्मा फुले मंडई परिसरात अभिनव आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यांना पट्टी बांधण्यात आली होती. झोपेचे सोंग घेतलेल्या वसुली सरकारने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मुळीक पुढे म्हणाले, आपले अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवून टीका करीत असते. केंद्र सरकारने इंधनाचे भाव कमी केल्यानंतर राज्यातील आघाडीचा खरा चेहरा नागरिकांपुढे उघडा पडला आहे. इंधनावरील व्हॅट कमी केल्यास सर्वच वस्तूंच्या किमती कमी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. परंतु हप्ता वसुली, बदल्यांमधील भ्रष्टाचार, गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालणे, जनतेमध्ये दहशत निर्माण करणे हे राज्य सरकारचे प्राधान्यक्रम आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात इंधनावरील जिझिया कर सहन करावा लागत आहे.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, उपाध्यक्षा स्वरदा बापट, महिला अध्यक्ष अर्चना पाटील, प्रमोद कोंढरे, रवींद्र साळेगावकर, धनंजय जाधव आणि इतर शहर पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0