Byelection : pune Congress : महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर देगलुर – बिलोली पोटनिवडणुकीत विजयी : काँग्रेस भवन येथे जल्लोष.

HomeपुणेBreaking News

Byelection : pune Congress : महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर देगलुर – बिलोली पोटनिवडणुकीत विजयी : काँग्रेस भवन येथे जल्लोष.

Ganesh Kumar Mule Nov 02, 2021 3:46 PM

Jansanvad Yatra | Pune Congress | पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंटमध्ये जनसंवाद यात्रा
Pune Congress | भाजप आमदार सुनिल कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी – अरविंद शिंदे
Pune : Congress Vs BJP : पुणे शहर काँग्रेसला खिंडार : कॉंग्रेस नेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपात प्रवेश

महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर देगलुर – बिलोली पोटनिवडणुकीत विजयी

: काँग्रेस भवन येथे जल्लोष

                                     

पुणे : नांदेड येथील देगलुर – बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेश अंतापूरकर प्रचंड बहुमताने विजयी झाले. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे ढोलीबाजा वाजवून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

मोदी सरकारच्या विरूध्दचा संताप व्यक्त : बागवे

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, सोनाली मारणे उपस्थित होते. यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली देगलुर – बिलोली विधानसभा मतदार संघाची निवडणुक झाली. प्रचाराच्या दरम्यान केंद्रातील मोदी सरकारच्या चूकीच्या आर्थिक धोरणाबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे. महागाई बेरोजगारीमुळे जनता त्रस्त झालेली आहे. लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेवाराला भरघोस मंतानी निवडूण देऊन मोदी सरकारच्या विरूध्दचा संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करीत आहे. देगलुर- बिलोली मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजून मतदान करून महाराष्ट्राच्या जनतेने सरकारवर आपला विश्वास दाखविलेला आहे.’’

     यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘महाविकास आघाडी सरकारने गेल्या २ वर्षात महाराष्ट्रात अनेक विकासाची कामे केली आहे. केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्र सरकारला सातत्याने कुठल्या न कुठल्या पध्दतीने त्रास देण्याचे काम करीत आहे. या सर्व गोष्टींवर मात करून आज मुख्यमंत्री मा. ना. उध्दवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार व महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राला एक मजबूत सरकार दिले आहे. यांच्या कामाची पावती आज देगलुर – बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये तेथील जनतेन दिलेली आहे.’’

     माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाने ही पोटनिवडणुक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्या नेत्यांनी अपप्रचार करून लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला परंतु सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखविली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मा. जितेश अंतापूरकर यांना देगलुर – बिलोली मतदार संघातून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल मी शुभेच्छा देतो.’’

     यावेळी नीता रजपूत, शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, रजनी त्रिभुवन, अकबर शेख, विशाल मलके, द. स. पोळेकर, प्रविण करपे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, विजय खळदकर, रमेश सकट, सुनिल घाडगे, राहुल वंजारी, सेल्वराज ॲन्थोनी, विजय वारभुवन, विश्वास दिघे, राहुल तायडे, दत्ता पोळ, नारायण पाटोळे, विव्हियन केदारी, शारदा वीर, माया डुरे, रजिया बल्लारी, परवेज तांबोळी, राजू नाणेकर, राजाभाऊ कदम, सादीक कुरेशी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 2