PMC : Bonus : बोनस दिवाळीलाच; कोविड भत्यासाठी मात्र वाट पाहावी लागणार 

HomeपुणेPMC

PMC : Bonus : बोनस दिवाळीलाच; कोविड भत्यासाठी मात्र वाट पाहावी लागणार 

Ganesh Kumar Mule Oct 25, 2021 2:35 PM

Bonus | contract workers | मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासन सकारात्मक | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती
Diwali Advance | PMC Pune | अखेर मनपा कर्मचाऱ्यांना मिळाला दिवाळी एडवान्स!!  | बोनसचे सर्कुलर मात्र अजूनही नाही 
7th Pay Commission : PMC : बोनस मिळाला; आता वाढीव वेतन कधी?  महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला सवाल

बोनस दिवाळीलाच; कोविड भत्यासाठी मात्र वाट पाहावी लागणार

बोनस बाबत कार्यवाही करण्याचे प्रशासनाचे आदेश

पुणे : महापलिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोनस देण्याबाबत मुख्य सभेने नुकतीच मान्यता दिली आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ही यामध्ये समावेश आहे. शिवाय सानुग्रह अनुदान आणि बोनस बाबत आगामी ५ वर्षाचा करार करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहूर्ताला बोनस मिळेल अशी तजवीज प्रशासनाकडून केली जाते. यंदा मात्र बोनस सोबत ३ हजाराचा कोविड प्रोत्साहन भत्ता देण्यासही मुख्य सभेने मान्यता दिली आहे. दरम्यान बोनस बाबत कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्याबाबतचे एक परिपत्रक देखील जरी करण्यात आले आहे. त्यानुसार बोनस  दिवाळीच्या मुहूर्ताला मिळेल. मात्र कोविड भत्ता मात्र डिसेंबर महिन्यात मिळेल. हा भत्ता नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनात देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र दिवाळी साजरी करण्यासाठी मदत होईल म्हणून कर्मचारी भत्ता मिळेल अशी आशा करत होते. मात्र बक्षिसी मिळण्याची वाट पहावी लागणार आहे.

: मुख्य सभेने दिली आहे मान्यता

मुख्माय सभेच्या मान्यतेनुसार  सन २०२०-२०२१ ते सन २०२४-२०२५ या पाच वर्षाकरिता ८.३३ टके अधिक जादा रक्कम प्रत्येक वर्षी सन २०२०-२०२१ करिता रकम रुपये
१७०००/-, सन २०२१-२०२२ करिता रकम रुपये १९०००/-.सन २०२२-२०२३ करिता रकम रुपये २१०००/-,सन २०२३-२०२४ करिता रकम रुपये २३०००/-,सन २०२४-२०२५ करिता रकम रुपये २५०००/-, याप्रमाणे सानुग्रह अनुदान अदा करणेस मा. मुख्य सभेने संदर्भ क्र.२ चे ठरावाव्दारे एकूण पाच वर्षाकरिता सानुग्रह अनुदान
व करारमाना करणेस व पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/ सेवकांना २०२१-२२ या वर्षी करता रक्कम रूपये ३०००/- कोविड प्रोत्साहन भत्ता आदा करणेस मान्यता देण्यात आली आहे. मान्यतेनुसार कार्यवाही करण्यात यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

१. पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना, प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना व बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक तसेच शिक्षण सेवकांना सन २०२०-२०२१ च्या मुळ वेतन + ग्रेड पे +
महागाई भत्ता यावर ८.३३% + र.रू.१७,०००/- इतके सानुग्रह अनुदान उपस्थितीचे प्रमाणात आदा करण्यात यावे.

२. ज्या वर्षाकरिता सानुग्रह अनुदान द्यावयाचे त्या आर्थिक वर्षामध्ये संबंधीत सेवकांची(घाणभत्ता देय असणाऱ्या सेवकांसह) कामावरील प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस असण्याची अट लागू राहील या मध्ये प्रसुतीचे / तत्सम रजा अथवा वैद्यकिय रजा यांचाही अपवाद करण्यात येणार नाही तथापि फक्त कामावर असताना व काम करित
असताना घडलेल्या अपघातामुळे विशेष वैद्यकिय रजा एखाद्या सेवकास द्यावी लागली असल्यास अशी रजा मनपा सेवानियमाच्या मयदित हजेरी धरण्यात येईल.

३. किमान एक वर्ष शासकिय सेवा झालेल्या सेवकांची त्यापुढील आर्थिक वर्षातील हजेरी विचारात घेऊनच सानुग्रह अनुदान देय राहील

५. सर्व पात्र सेवकांना सानुग्रह अनुदान द्यावयाचे असल्याने सदरची बिले ऑडीट विभागातून दिनांक २७/१०/२०२१ अखेर पर्यंत तपासून घ्यावीत. सदरच्या रकमा बँक खात्यातून आदा होणार असल्याने त्याबाबतची आवश्यक ती संगणक प्रणाली (व्हर्जन) सांख्यिकी व संगणक कार्यालयाकडून त्वरीत प्राप्त करून घ्यावी.
६. ज्या अधिकारी/सेवकांना सानुग्रह अनुदानातून आयकर व पुरसंचय निधी योजना लागू असलेल्या ज्या सेवकांना पुरसंचय निधीची वर्गणी कपात करावयाची आहे त्यांनी त्याबाबतची पूर्वसुचना संबंधीत बिल लेखनिकांना देणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे आयकर व पुरसंचय निधी वर्गणी कपात करण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये
करण्यात आली आहे.
७. पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/ सेवकांना फक्त या वर्षी सन २०२१-२२ करता रक्कम रुपये ३०००/- (अक्षरी – तीन हजार रूपये फक्त) कोविड प्रोत्साहन भत्ता नोव्हेंबर पेड डिसेंबर २०२१ च्या वेतन मध्ये आदा करणे. त्यांची नोंद सेवकांच्या सेवापुस्तकात करणे.
८. माहे सप्टेंबर २०२१ चे वेतन संबंधीत सेवकास ज्या खात्याकडून देण्यात आले आहे.त्या खात्याने सानुग्रह
अनुदान आदा करावयाचे आहे.

: सानुग्रह अनुदानाबाबत अटी/शर्ती

१. सन २०२०-२०२१ मध्ये रोजंदारी कामगारांनी किमान १८० दिवस काम केले असेल तर त्यांना सेवाकालावधीनुसार व हजर दिवसांच्या प्रमाणात सदर रकमा देण्यात याव्यात. रोजंदारीसाठी २६ दिवसांचा महिना असल्याने सानुग्रह अनुदानातील जादा रकमेस ३१३ दिवसांनी भागून दैनिक दर काढण्यात यावा. तसेच, खाडे
रोजंदारी कामगारांना हजर दिवसांच्या प्रमाणात सदर रकमा देण्यात याव्यात. मात्र रोज काढताना ३१३ दिवसांनी भागून दैनिक दर काढण्यात यावा.
२. सन २०२०-२०२१ या वर्षासाठी देय सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होण्यापूर्वी ज्या सेवकांना बडतर्फ केले असेल अशा अधिकारी/सेवकांना सानुग्रह अनुदान दिले जाणार नाही. त्याचप्रमाणे खातेनिहाय चौकशी कामी व अन्य कारणांमुळे ज्या अधिकारी/सेवकांना कामावरून निलंबित केले असेल अशा
अधिकारी/सेवकांना खातेनिहाय चौकशीचे काम व अन्य कार्यवाही पूर्ण होऊन त्याबाबतचा अंतिम निर्णय घोषित होईपर्यंत सदर रक्कम दिली जाणार नाही,
३. ज्या अधिकारी/सेवकांनी सन २०२०-२०२१ या वर्षात महापालिकेची सेवा केली आहे परंतु, त्यांची सेवा सेवानिवृत्ती/वैद्यकिय दृष्ट्या अपात्र अगर मृत्यु या कारणामुळे संपुष्टात आली असेल अशा अधिकारी/सेवकांना सेवेच्या कालावधीनुसार उपस्थितीच्या प्रमाणात वरील प्रमाणे रकमा देण्यात याव्यात.

: निधी कपात केली जाणार

महापालिका प्रशासनाच्या आदेशानुसार बोनस आणि सानुग्रह अनुदानातून संघटन निधी ची कपात केली जाणार आहे. त्यानुसार वर्ग १ व २ मधील अधिकाऱ्यासाठी ७०० रुपये, वर्ग ३ मधील अधिकारी व सेवक ५०० रुपये तर वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांचे ४०० रुपये कापण्यात येतील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0