BJP Vs NCP – Sharadchandra Pawar | महाराष्ट्राला दिलेला १०.५ लाख कोटी रुपये निधीचा लेखाजोखा मुरलीधर मोहोळ यांनी मांडावा   | शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा जोरदार प्रहार

HomeपुणेBreaking News

BJP Vs NCP – Sharadchandra Pawar | महाराष्ट्राला दिलेला १०.५ लाख कोटी रुपये निधीचा लेखाजोखा मुरलीधर मोहोळ यांनी मांडावा  | शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा जोरदार प्रहार

गणेश मुळे Jul 23, 2024 3:48 PM

RSS | BJP | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यामध्ये समन्वय बैठक | गृहमंत्री, सरसंघचालक, राष्ट्रीय अध्यक्ष राहणार उपस्थित
Pune Congress Agitation | भाजप प्रेरित मनुस्मृतीचे राज्य कधीही काँग्रेस येऊ देणार नाही – अरविंद शिंदे
RSS Meeting in Pune | संघाच्या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा | सुनील आंबेकर

BJP Vs NCP – Sharadchandra Pawar | महाराष्ट्राला दिलेला १०.५ लाख कोटी रुपये निधीचा लेखाजोखा मुरलीधर मोहोळ यांनी मांडावा

| शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा जोरदार प्रहार

 

Amit Shah Vs Sharad Pawar – दोन दिवसांपूर्वी भाजप नेते अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र भाजपचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात अमित शहा यांनी “भ्रष्टाचाराचे सरगना” म्हणत शरद पवारांना डिवचले होते. या मेळाव्यातील ४० मिनिटांच्या भाषणात अमित शहा यांनी ३० मिनिटे शरद पवार यांच्यावर टीका केली.अमित शहा यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्या टीकेची चिरफाड केली आहे.

महाराष्ट्रात येऊन बातम्यांमध्ये झळकण्यासाठी अमित शहा यांना पवार साहेबांच्या नावाचा आधार घ्यावा लागतो असं म्हणत प्रशांत जगताप यांनी जोरदार हल्ला चढवला. तीन वर्षे तडीपार असलेल्या माणसाने एकही गुन्हा नोंद नसलेल्या शरद पवारांवर टीका करणे हास्यास्पद आहे असं म्हणत तडीपारीची शिक्षा भोगत असताना अमित शहा यांना महाराष्ट्राने आश्रय दिला याची आठवणही प्रशांत जगताप यांनी करून दिली.

गेल्या दहा वर्षांपासून अमित शहा सत्तेत आहेत, भाजपचे सर्वेसर्वा आहेत. दहा वर्षांच्या सत्ताकाळात अमित शहांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे सांगावं असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आलं आहे. अमित शहा शरद पवारांना भ्रष्टाचारी टोळीचे सरदार म्हणालेत, त्या टोळीतील सर्वच सदस्य सध्या अमित शहांचा पक्ष अर्थात भाजपच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, ते सगळे भाजपमध्ये जाताच संत झाले का ? हा सवाल प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला. अमित शहांनी सूचना केल्या प्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे भाजप सरकारने महाराष्ट्राला दिलेला १०.५ लाख कोटी रुपये निधीचा लेखाजोखा मांडण्याचे आदेश दिले आहेत, त्याप्रमाणे त्यांनी सदर पैसा कुठे खर्च झाला याचा हिशोबही द्यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी केली.

झालेली विकासकामे ही कर्ज काढून झाली आहेत, या कर्जाची परतफेड जनतेच्या खिशातून होत आहेत. म्हणून, कोणत्याही विकासकामांचं श्रेय घेण्याचा अधिकार भाजपला नाही असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला.
अमित शहा यांना श्रेय घ्यायचं असेल तर सर्वच पक्षांतील भ्रष्टाचारी, गुन्हेगार लोकांना भाजपमध्ये घेऊन पावन केल्याचं श्रेय घ्यावं, महाराष्ट्रात सुरू असलेल्या ठोकशाहीच्या राज्याचं श्रेय घ्यावं, महाराष्ट्रावर असलेल्या ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचं श्रेय घ्यावं असं सल्ला प्रशांत जगताप यांनी दिला.
“जसा गुरू, तसा चेला” असं म्हणत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरही प्रशांत जगताप यांनी जोरदार हल्लाबोल केला. पवार साहेबांबद्दल बोलण्याची आपली योग्यता आहे का याचे धीरज घाटे यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला प्रशांत जगताप यांनी दिला. धीरज घाटे स्वतःच्या घराजवळही सुरक्षेशिवय फिरू शकत नाही, स्वतःवर अनेक गुन्हे दाखल असलेल्या धीरज घाटे यांनी स्वतःची काळजी करावी, इतरांची बरोबरी करू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने केले.

अमित शहा व त्यांच्या चेल्यांनी शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी आपल्या पक्षात, मंत्रीपदावर बसलेल्या नेत्यांकडे बघावे असा इशारा देत, शरद पवारांवर कारवाई करणाऱ्या इडी ला २४ तासांत माघार घ्यावी लागली होती याचीही आठवण करून दिली.