PMC Employees Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव!

HomeपुणेBreaking News

PMC Employees Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव!

गणेश मुळे Jul 24, 2024 6:11 AM

PMC Employees Transfer | एका खात्यात ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या 40% अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्वरित करा
CHS Portal | PMC Health Service | Computerization of CHS! | Mandate to municipal employees to fill information on portal for CHS card
PMC Biometric Attendance  | नोंदणी ७९८२ कर्मचाऱ्यांची; प्रत्यक्ष हजेरी मात्र ३ ते साडे तीन हजार कर्मचाऱ्यांची | बायोमेट्रिक हजेरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

PMC Employees Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव!

PMC Employees Advance – (The Karbhari News Service) पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी (Pune Municipal Corporation Employees) आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना सणासाठी म्हणून १० हजाराची उचल रक्कम बिनव्याजी दिली जाते. जी दहा समान हप्त्यात वसूल केली जाते. ही रक्कम आता २० हजार इतकी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचा-यांना सणासाठी उचल म्हणून प्रचलित कार्यपध्दती नुसार सरसकट र१०,०००/- ( दहा हजार फक्त) प्रतिवर्षी अदा करून प्रचलित कार्यपध्दतीनुसारच दहा समान मासिक व्याजरहित हप्त्यामध्ये वसुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांनी महापालिका आयुक्त यांजकडे सध्या देण्यात येणारी सणासाठी उचल  १०,०००/- पुरेशी नसल्याने ती  २०,०००/- इतकी अदा करण्यात यावी. अशी मागणी केली होती. तसेच सुधीर जानजोत, माजी सभासद, यांनी देखील पत्र दिले होते. महागाईत प्रचंड वाढ झालेली असल्याने, सन साजरे करण्यास अडचण होत असल्याने चालू वर्षीपासून देण्यात येणारी सणासाठी उचल २०,०००/- करण्यात यावी, असे जानज्योत यांनी म्हटले होते.  त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. (Pune PMC News)

प्रस्तावात म्हटले आहे की, सेवक संख्या व प्रती सेवक १०,०००/- इतकी सणासाठी उचल विचारात घेऊन  २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात १८ कोटी इतकी तरतुद केली आहे.  १०,०००/- सणासाठी उचल यावरून र.रु.२०,०००/- इतकी म्हणजे दोन पटीने एकावेळेस करणे झाल्यास सेवक संख्या १७६०० करिता ३५,२०,००,०००/- इतकी तरतूद करणे आवश्यक ठरेल. त्यामुळे कमी पडणारी उर्वरित रक्कम तसलमात दुबेरजी

खात्याचे अंदाजपत्रकातील जमा व खर्च बाजू आवश्यक त्या प्रमाणात वाढवून घेणे आवश्यक ठरेल. तसेच, सेवक संख्या व प्रती सेवक २०,०००/- इतकी सणासाठी उचल देण्याबाबतची मान्यता स्थायी समिती मार्फत मा. मुख्य सभेची घेणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.