BJP Pune on Pune Rain | पुणे महानगरपालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना घरी पाठवा | धीरज घाटे

HomeपुणेBreaking News

BJP Pune on Pune Rain | पुणे महानगरपालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना घरी पाठवा | धीरज घाटे

गणेश मुळे Jun 11, 2024 12:48 PM

Viksit Bharat Sankalp Yatra | विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
Budget Provision | यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार
PMC Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स च्या सवलती आणि बिलांबाबत पुणे महापालिका FM रेडिओ वरून करणार जाहिरात 

BJP Pune on Pune Rain | पुणे महानगरपालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना घरी पाठवा | धीरज घाटे

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुण्यामध्ये पहिल्या पावसात संपूर्ण पुणे शहरात पाणीच पाणी झाल्याचे चित्र दिसून आले. नालेसफाई आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागात झालेली दिरंगाई यावरून क्षेत्रीय कार्यालयात पुरेशी साधन सामग्रीची कमतरता यामुळे पुणेकर पहिल्याच पावसात त्रस्त झाले होते. याच पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आज शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate BJP) यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांची भेट घेऊन निवेदन दिले. (Pune PMC News)

या वेळी बोलताना घाटे म्हणाले की ‘भाजप च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत आयुक्तांना भेटलो. निवडणुकी नंतर देखील भेटून पावसाळा तयारीचा आढावा घेतला होता व सूचना दिल्या. परंतु शनिवारी अनेक भागात रस्त्यांवर गुडघाभर पाणी होते.
क्षेत्रीय कार्यालायतील अधिकारी, कर्मचारी फिल्डवर दिसत नाहीत. लोकप्रतिनिधी कार्यकर्ते घटनास्थळी असतात. अधिकारी असले तरी त्यांच्याकडे यंत्रसामुग्री नसते, उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. याचा पालिकेने विचार करावा. शासनाचे अधिकारी आहेत. त्यांना शहराची माहिती नसते. याचा परिणाम होतोय. त्यामुळे अशा निष्क्रिय अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून घरी पाठवा.

लवकरच संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्यापालख्या पुण्यात येत आहे. महानगरपालिकेची यंत्रणा लावण्यास .सुरुवात करावी , शाळा मध्ये सर्व प्रकारे तयारी करावी अशी मागणी केली.
आपत्ती व्यवस्थापन विभागात उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक रात्रपाळी साठी करावी अशीही मागणी शिष्टमंडळाने य वेळी केली.

या शिष्टमंडळात शहराध्यक्ष धीरज घाटे ,आमदार भीमराव तापकीर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सुशील मेंगडे, प्रसन्न जगताप अजय खेडेकर राजेश येनपुरे,सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर, रवींद्र साळेगावकर ,राहुल भंडारे ,राघवेंद्र मानकर वर्षा तापकीर सुभाष जंगले राजेंद्र काकडे अर्जुन जगताप सचिन बालवडकर पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते