Sindoor Yatra BJP | पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’

HomeBreaking News

Sindoor Yatra BJP | पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’

Ganesh Kumar Mule May 19, 2025 8:01 PM

PM modi birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात १ हजार ५८ स्वच्छ्ता कार्यक्रम
Pune News | Mohan Joshi | पुणेकरांनी भाजपला खूप काही दिले; पण भाजपने शहराला काय दिले? | मोहन जोशी यांचा भाजपला सवाल 
BJP Mahila Morcha Pune | महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत | हर्षदा फरांदे

Sindoor Yatra BJP | पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’

Pune News – (The Karbhari News Service) – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज सोमवार, 19 मे रोजी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’चे आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक आहिल्यादेवी स्मारक येथून शंखनादन व हनुमान चालीसा पठाण करून या सिंदूर यात्रेची सुरुवात होऊन परत तिथेच समारोप सभा झाली. (Pune BJP Mahila Morcha)

मातालहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Screenshot

लहान मोठ्या रणरागिणींकडून लाठीकाठी चे प्रदर्शन करण्यात आले. महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा ताई फरांदे म्हणाल्या , ही सिंदूर यात्रा आपल्या मातृ शक्तीचा प्रतीक आहे ज्या भगिनींनी पहेलगाम हल्ल्यामध्ये आपले कुंकू गमावले आपल्या भारतीय सैन्यातील कुशल स्त्रीशक्तीने दुश्मनावर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले आहे त्यामुळेच आपली ही सिंदूर यात्रा तमाम स्त्री शक्ती साठी समर्पित आहे.

मेजर देशपांडे यांच्या प्रतिकात्मक संदेशात स्त्री शक्तीची महानता नमूद करण्यात आली. त्यांचे दोन्हीही पुत्र सैन्यात असून त्यांना त्याचा खूप अभिमान आहे.

Screenshot

या सिंदूर यात्रेत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्ष सौ हर्षदा फरांदे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे,भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस प्रियांका शेंडगे शिंदे, गायत्री खडके, भावना शेळके, आरती कोंढरे, स्वाती मोहोळ यांच्या सह विविध संघटननांच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते व पुणेकर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: