महाराष्ट्र बंद ला पुण्यात चांगला प्रतिसाद
: महाविकास आघाडी च्या वतीने बाईक रैली
पुणे : लखीमपुर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्याला राज्य भरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला. पुण्यातही हा बंद यशस्वी झाल्याच्या पाहण्यास मिळाला. आघाडीतील घटक पक्षांनी वेगवेगळ्या पद्ध तीने हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. यात कॉंग्रेस ही मागे नव्हती. खास करून शहरातील उपनगरामध्ये कॉंग्रेस ने वेगवेगळे कार्यक्रम आखत बंद मध्ये सहभाग नोंदवला. कोथरूड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या (kothrud block congress comeetee) वतीने बाईक रैली चे आयोजन करण्यात आले होते. त्याला ही चांगला प्रतिसाद मिळाला. अशी माहिती कमिटी चे अध्यक्ष विजय खळदकर यांनी दिली.
: शेतकरी बांधवाना न्याय मिळावा
याबाबत विजय खळदकर यांनी सांगितले कि, आज महाविकास आघाडी (mahavikas Aghadi) तर्फे ०४ ऑक्टोबरला झालेल्या लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून, महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. गेले वर्षभर शांततेत मोर्चा काढणाऱ्या शेतकरी बांधवाना भाजप सरकार क्रूरपणे वागवून शेतकरी आंदोलन चिरडत आहेत. तरी संबंधित आरोपींना अटक देखील झाली नाही. हे आंदोलन करून त्या शेतकरी बांधवाना न्याय मिळावा, म्हणून महाविकास आघाडीने आज बंदची (bandh) हाक दिली. त्याला पक्ष्याचे सर्व पदाधिकारी व छोटे मोठे व्यापारी संघटना यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला त्याबाद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असे ही खळदकर म्हणाले.
आंदोलन करून त्या शेतकरी बांधवाना न्याय मिळावा, म्हणून महाविकास आघाडीने आज बंदची हाक दिली व त्याला पक्ष्याचे सर्व पदाधिकारी व छोटे मोठे व्यापारी संघटना यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्याबाद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार!
COMMENTS