Bhima Koregaon | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम
– डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग
– सलग आठ वर्ष उपक्रम
Vijaystambh Bhima Koregaon – (The Karbhari News Service) – 1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त राज्यासह देशभरातून सुमारे २० लाख पेक्षा अधिक भीम अनुयायी भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी रोजी विजयस्तंभ परिसरामधे (Vijaystambh) स्वच्छता रहावी व स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतला. या वेळी परिसरातील कचरा, पाण्याच्या बॉटल, कागद आदी उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. डॉक्टर धेंडे यांच्या पुढाकाराने सलग आठ वर्ष हा उपक्रम राबविला जातो.
या स्वच्छता उपक्रमात या मोहिमेत विजय कांबळे, अनिल कांबळे, सुनिल भालेराव, परशुराम भोसले, संदिप चाबुकस्वार, निलेश चव्हाण, पेरणे ग्रामपंचायतचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सामाजिक संस्था आदींसह विविध जणांनी सहभाग घेतला.
भीमा कोरेगावला ऐतिहासिक वारसा आहे. त्यांच्या आठवणींचे जतन भीम अनुयायी करत असतात. ही ऐतिहासिक आठवण स्मरणात रहावी, यासाठी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. एवढ्या प्रचंड संख्येनंतर या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी देखील आपलीच आहे, या सामाजिक भावनेतून परिसरात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे, अशी माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.
—-
स्वच्छता मोहीम राबविण्याची हे आमचे ८ वे वर्ष आहे. या माध्यमातुन सामाजिक संदेश देत आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने सामाजिक व भौतिक स्वच्छता करण्यासाठी अग्रेसर आहोत. कुठल्याही समाजाला त्रास होता कामा नये ही भुमिका आहे.
–
डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
—————————-
COMMENTS