Balewadi Wakad Missing Link | बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी | हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी  ‘शॉर्टकट’ 

Homeadministrative

Balewadi Wakad Missing Link | बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी | हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी  ‘शॉर्टकट’ 

Ganesh Kumar Mule Apr 08, 2026 1:33 PM

MLA Sunil Kamble | महारोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराला तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद
Mahayuti | Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती
PM Modi Pune Tour | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी महायुतीची जय्यत तयारी पूर्णत्वास | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सभास्थळ पाहणी

Balewadi Wakad Missing Link | बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी | हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी  ‘शॉर्टकट’

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) –  बाणेरमधील कस्पटे वस्ती परिसरातील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती देण्यासाठी, बालेवाडी-वाकड पूल रस्ता जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अखेर जारी करण्यात आली आहे. (Pune News)

बुधवारी ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, आता कस्पटे वस्ती येथील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. या अधिसूचनेनुसार, बाणेर-वाकड पुलासाठी बाणेर भागातील विकास योजनेतील (DP) ३० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

हे संपादन महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २०५ अन्वये आरक्षित केलेल्या जागेसाठी होणार आहे. तसेच, विकास आराखड्यानुसार हा रस्ता ३० मीटर रुंद असणार आहे, ज्यामुळे भविष्यातील वाढती वाहतूक विचारात घेऊन तिथे सुसज्ज पदपथ आणि सायकल ट्रॅकचेही नियोजन करण्यात आले आहे.

“बाणेर ते वाकड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बालेवाडी-वाकड उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग लवकरात लवकर खुला व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. आता अधिसूचना निघाल्याने कामाला वेग आला असून, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी मुक्तता होईल,” असा विश्वास ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

या रस्त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी हा ‘शॉर्टकट’ ठरणार आहे. यामुळे मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील राधा चौक आणि भुजबळ चौक येथील वाहतूक कोंडीचा भार ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0