Pune PMC News | स्थायी समिती करणार  ऑडीट उपसमिती आणि अपिल उपसमितीची नियुक्ती!

Homeadministrative

Pune PMC News | स्थायी समिती करणार  ऑडीट उपसमिती आणि अपिल उपसमितीची नियुक्ती!

Ganesh Kumar Mule Apr 08, 2026 7:45 PM

PMC Ward 28 – Janata Vasahat Hingane Khurd | प्रभाग क्रमांक २८ – जनता वसाहत – हिंगणे खुर्द | या प्रभागात येणारे परिसर आणि रचना सविस्तर जाणून घ्या 
MLA Sunil Kamble | पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि STP प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य  – उदय सामंत | आमदार सुनील कांबळे यांनी मांडली होती लक्षवेधी सूचना
Promotion committee | PMC pune | पदोन्नतीने टॅक्स विभागात येण्यासाठी समितीची बैठक होण्याआधीच जोरदार लॉबिंग!  | प्रशासन अधिकारी व अधीक्षक होण्यासाठी बरेच इच्छुक 

Pune PMC News | स्थायी समिती करणार ऑडीट उपसमिती आणि अपिल उपसमितीची नियुक्ती!

| दोन्ही उपसमितीत कमीत कमी तीन सदस्य

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – स्थायी समितीच्या उद्याच्या बैठकीत ऑडीट उपसमिती आणि अपिल उपसमितीची नियुक्ती केली जाणार आहे. या उपसमित्या अपील अहवाल आणि ऑडीट अहवालावर निर्णय घेतात आणि आपली शिफारस स्थायी समितीला करतात. त्यानुसार या उपसमित्या नियुक्त केल्या जाणार आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २४(२) अन्वये स्थायी समितीपुढे येणाऱ्या अपिल अहवालावर निर्णय घेण्याकरीता स्थायी समिती सभासदांची एक उपसमिती नियुक्त करते. यामध्ये महापालिका कर्मचारी आणि अधिकारी हे आपल्या एखाद्या प्रकरणा बाबत अपील करत असतात.  त्याचप्रमाणे स्थायी समितीपुढे येणाऱ्या ऑडीट अहवालावर निर्णय घेण्याकरीता स्थायी समिती सभासदांची एक उपसमिती नियुक्त करते. महापालिका मुख्य लेखापरीक्षक आपले विविध अहवाल या समिती समोर ठेवतात.  या दोन्ही  समितीत कमीत कमी तीन सदस्य असावेत, असा नियम आहे.

आता सार्वत्रिक निवडणूक झाल्या असल्याने स्थायी समितीची नव्याने नेमणूक झाली आहे. त्यानुसार स्थायी समिती मधील १६ सदस्यांपैकी ३ किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य या उपसमितीत नियुक्त केले जातात. सदस्य नियुक्त केल्यानंतर यात हे सदस्य आपला अध्यक्ष निवडतात. दोन्ही उपसमित्या आपल्याकडे दाखल होणाऱ्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतात आणि त्याची शिफारस स्थायी समितीला करतात.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: