शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी शिला मोहिते यांची नियुक्ती
संघटनेचे प्रवक्ते अशोक बालगुडे यांची माहिती.
पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय किसान संघटना नवी दिल्ली चे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली भारत देशात सोळा राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे महिला आघाडी अध्यक्षपदी फलटण जिल्हा सातारा येथील शिला चंद्रकांत मोहिते यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अशोक बालगुडे यांनी संघटनेच्या ऑनलाईन बैठकीमध्ये केली.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख दिपक फाळके, फलटण तालुकाध्यक्ष अमोल पिसाळ, प्रदेश प्रभारी प्रभारी अध्यक्षा व मराठवाडा विभाग अध्यक्षा सौ स्वातीताई कदम तसेच संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रकाश पाटील, डॉक्टर राजू चौधरी, संघटनेचे कामगार आघाडी अध्यक्ष हिरामण बांदल, संघटनेच्या महिला आघाडी प्रदेश सचिव सौ मालती पाटील, प्रदेश सहसचिव सौ स्वातीताई अजित कदम, संघटनेचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, हडपसर मतदार संघ युवक अध्यक्ष महेश गिरी यावेळी उपस्थित होते.
शिला मोहिते या सहकार, कामगार, सामाजिक क्षेत्रामधील अभ्यासू व सामाजिक कार्यकर्त्या असून त्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या सभासद होत्या. त्यांच्या सहकार, कामगार, सामाजिक क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव व संघटनेमध्ये नव्याने जाहीर होत असलेल्या कार्यकारणी मध्ये त्यांची सदस्य म्हणून प्राथमिक निवड प्रदेशाध्यक्ष यांनी केलेली होती. परवा दिनांक २३ रोजी त्यांना संघटनेचा बिल्ला व प्रदेशाध्यक्ष नियुक्ती पदाचे पत्र संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांच्या हस्ते देण्यात आले. अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अशोक बालगुडे व पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख दीपक फाळके यांनी दिली.
महीला आघाडी अध्यक्षा म्हणून शिला मोहिते यांचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे तर संघटनेच्या १२०० हून अधिक ग्रुप वर ही मोठ्या संख्येने स्वागत केले आहे अशी माहिती संघटनेच्या प्रदेश महीला आघाडी प्रवक्त्या सौ स्वातीताई अजित कदम, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख दिपक फाळके यांनी सांगितले.
COMMENTS