Anti-Microbial Resistance – AMR | डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक (Antibiotics) औषधे घेऊ नका | पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आवाहन

Homeadministrative

Anti-Microbial Resistance – AMR | डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक (Antibiotics) औषधे घेऊ नका | पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आवाहन

Ganesh Kumar Mule Dec 02, 2025 9:46 PM

Yoga Training : PMC : महापालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्रात योगा प्रशिक्षण  : पुणेकरांना मिळतोय लाभ 
PMC Pune Health Schemes |  Pune Municipal Corporation’s ranking improved in health schemes
Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका

Anti-Microbial Resistance – AMR | डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक (Antibiotics) औषधे घेऊ नका | पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आवाहन

 

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – शासन मार्गदर्शक सूचनांनुसार अँटी मायक्रोबियल रेसिस्टन्स (AMR) प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अँटी मायक्रोबियल रेसिस्टन्स (Anti-Microbial Resistance / AMR) ही आज जगासमोरील एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. जीवाणू, विषाणू, बुरशी व परजीवी यांवर प्रभावी असलेली औषधे (प्रतिजैविके ) त्यांच्या अति व चुकीच्या वापरामुळे निष्प्रभ होत असून संसर्गजन्य आजारांवरील उपचार अधिक गुंतागुंतीचे, खर्चिक व धोकादायक होत आहेत. AMR प्रतिबंधासाठी खालील महत्त्वाच्या सूचना नागरिकांनी काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन महापालिका आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी केले आहे. (Pune PMC News)

 

जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह २०२५ थीम “आत्ताच कृती करा: आपले वर्तमान वाचवा, आपले भविष्य सुरक्षित करा

|  जंतुसंसर्ग टाळण्याकरिता वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याची सवय व स्वच्छ पाणी वापरणे यावर भर द्यावा.
| जंतुसंसर्ग टाळण्याकरिता लसीकरण वेळेवर व पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
| डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक (Antibiotics) औषधे घेऊ नयेत.
| सर्दी, खोकला, ताप यांसारख्या व्हायरल आजारांमध्ये प्रतिजैविकांचा वापर करू नये

| डॉक्टरांनी सांगितलेला औषधांचा पूर्ण डोस व कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे.

| उरलेली औषधे भविष्यात वापरणे किंवा इतरांना देणे टाळावे.
|  रुग्णालये व आरोग्य संस्थांनी प्रतिजैविकांचा योग्य वापर व संसर्ग नियंत्रण उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात.

अँटी मायक्रोबियल रेसिस्टन्स रोखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग, जनजागृती आणि जबाबदारीपूर्ण औषध वापर अत्यावश्यक आहे. योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास भविष्यातील गंभीर आरोग्य धोके टाळता येतील. सर्व नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून “ जबाबदार औषध वापर” ही संकल्पना अंगीकारावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: