Annasaheb Waghire College Otur | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह” उत्साहात साजरा

HomeBreaking Newsपुणे

Annasaheb Waghire College Otur | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह” उत्साहात साजरा

Ganesh Kumar Mule Jul 29, 2023 12:02 PM

Reading Inspiration Day | पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन | डॉ वसंत गावडे  | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा 
Annasaheb Waghire College : मराठी भाषा सकस, समृद्ध व सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे : डॉ. वसंत गावडे यांचे प्रतिपादन 
Dr. Vasant Gawde | राष्ट्रीय सेवा योजना ही भारतातील युवकांची सर्वात मोठी चळवळ |  डॉ वसंत गावडे

Annasaheb Waghire College Otur | ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयांमध्ये दि.२४ ते २९ जुलै २०२३ या कालावधीमध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०” या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.  उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०”या विषयावरील आधारित निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच विशेष व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे (Dr Abhay Khandagale) यांनी दिली. (Annasaheb Waghire College )Otur

आज महाविद्यालयामध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० “या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य खंडागळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या मनोगतामध्ये डॉ.खंडागळे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदलते शिक्षणाचे प्रारूप, अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा वापर, उच्च शिक्षणामध्ये आलेली क्रेडिट सिस्टीम, विद्यार्थ्यांना विषय निवडीचे असलेले स्वातंत्र्य, तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही कोर्स ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने पुर्ण करण्याची असलेली मुभा, विद्यार्थी केंद्रित व समाजाभिमुख शिक्षण या सर्व गोष्टींचा उल्लेख केला तसेच हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताच्या उज्वल भविष्याची नांदी ठरणार आहे असेही मत व्यक्त केले.

सदर शैक्षणिक सप्ताहामध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” २०२० या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूर्वा कुटे, द्वितीय क्रमांक सायली अहिनवे तर तृतीय क्रमांक सुरज राजोरे यांनी मिळवला.
निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घोलप तनुजा व डुंबरे अपेक्षा, द्वितीय क्रमांक आहेर प्रगती व डुंबरे अनुष्का यांनी तर तृतीय ठोंगिरे पायल यांनी क्रमांक मिळवला.
याचबरोबर पोस्टर स्पर्धेमध्ये अक्षदा पोपळे व श्रावणी सुर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक तर सानिका गिजरे व सानिका डुंबरे यांनी द्वितीय क्रमांक तर सुरज वाघमारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ.के.डी सोनवणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे, डॉ. बी.एम.शिंदे, डॉ.एस.एस लंगडे, डॉ.एस.बी वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल बिबे, डॉ.निलेश काळे,डॉ.वसंतराव गावडे,डॉ.अजय कवाडे तसेच कार्यालयीन कर्मचारी निखिल काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


News Title | Annasaheb Waghire College Otur | “National Education Policy Week 2020” celebrated with enthusiasm in Annasaheb Waghire College Otur