Ankush Kakde Vs Chandrakant Patil | दुसरे एखादे स्मारक करण्यापूर्वी ग दि.मा. स्मारक पूर्ण करा – अंकुश काकडे

HomeBreaking News

Ankush Kakde Vs Chandrakant Patil | दुसरे एखादे स्मारक करण्यापूर्वी ग दि.मा. स्मारक पूर्ण करा – अंकुश काकडे

Ganesh Kumar Mule Jul 23, 2025 9:23 PM

Ankush Kakade Vs Girish Bapat : बापटांनी मोहोळांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते पाहावे आणि जनतेला सांगावे 
Hemant Rasne Vs Ankush Kakade : शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली  : राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला 
Hemant Rasne Vs Ankush Kakade : शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली  : राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला 

Ankush Kakde Vs Chandrakant Patil | दुसरे एखादे स्मारक करण्यापूर्वी ग दि.मा. स्मारक पूर्ण करा – अंकुश काकडे

 

Pune News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काल पुण्यात सुधीर फडके यांचे स्मारक व्हावे अशी सूचना केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) चे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी म्हटले आहे कि, दुसरे एखादे स्मारक करण्यापूर्वी ग दि.मा. स्मारक पूर्ण करा. (Pune PMC News)

काकडे म्हणाले कि, निश्चितच सुधीर फडके यांचे स्मारक हे झाले पाहिजे, याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण  चंद्रकांत दादा २०१७ पासून महापालिकेमध्ये आपल्या पक्षाची एक हाती सत्ता असताना देखील कैलासवासी ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक आपण पूर्ण करू शकला नाहीत, ते काम अतिशय संथ गतीने चालू आहे. तेव्हा दुसरे एखादे स्मारक करण्यापूर्वी ग दि.मा. स्मारक पूर्ण करा. असे काकडे म्हणाले.

गदिमांप्रमाणे कोथरुडमध्ये सुधीर(बाबूजी) फडके यांच्या स्मारकाचा प्रस्ताव तयार करा! – चंद्रकांतदादा पाटील यांची मनपा आयुक्तांना सूचना

गदिमांप्रमाणे कोथरूड मध्ये सुधीर फडके अर्थात बाबूजींचे स्मारक उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करा, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने गीतरामायणाचे कवी ग. द. माडगूळकर यांचे स्मारक कोथरुड मध्ये उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गीतरामायणाचे संगीतकार असलेल्या सुधीरजी फडके यांच्या कार्यास साजेसे स्मारक कोथरुडमध्ये झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल. या दोन महान शिल्पकारांची स्मृती जतन करण्याची संधी यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेला मिळणार आहे. चांदणी चौक परिसर रस्ते विकासामुळे आणि बंगलोर-मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोथरुडजवळूनच जात असल्यामुळे हे स्मारक कोथरुड परिसरातच होणे आवश्यक वाटते.

यामुळे शहरातील वाहतुक या अडचणीशिवाय संपूर्ण राज्यातील आणि देशभरातील रिसकांना तसेच मान्यवर मंडळींना या दोन्ही स्मारकांमध्ये जाणे सोयीचे होईल. महाराष्ट्रातील आणि विदेशातील सुद्धा लक्षावधी रिसकांकडून पुणे महानगरपालिकेच्या या सांस्कृतिक कामाची नोंद घेतली जाईल. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुधीरजी फडके यांचे उचित स्मारक कोथरुडमध्ये उभे करण्याबाबत आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी सूचना ना. पाटील यांनी मनपा आयुक्तांना केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: