गणेशखिंड रस्त्याला पर्यायी रस्ता!
: PMRDA ने महापालिकेकडे मागितली परवानगी
: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्याय
हिंजवडी ते शिवाजी नगर मेट्रो लाईन-३ मार्गीकेचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक येथे गणेश खिंड रस्त्याने होणारी वाहतूक कोंडी विचारात घेता व दीर्घकालीन नियोजन करणेसाठी अस्तित्वातील पूल पाडून त्या ऐवजी एकाच खांबावर (pier) दुमजली पुलाचे (वर मेट्रो व त्या खाली दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल ) यांधकाम करणेचे काम प्रगतीत आहे. विद्यापीठ चोकामध्ये प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी रस्त्याच्या मध्यभागी बॅरीकेडस लावून करणे प्रस्तावित असून गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक पाहता अस्तित्वातील रस्त्याच्या उर्वरित रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहतूक नियमित प्रमाणे सुरळीत राहण्यासाठी प्राधिकरणामार्फत traffic diversion plan तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास दि. २६/१०/२०२१ रोजी संपन्न झालेल्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (PUMTA) बैठकी मध्ये मान्यता देण्यात आली आहे. आराखड्यानुसार Millennium गेट विद्यापीठ परिसर, विद्यापीठ चौक स्वामी विवेकानंद शाळापासून – Vamnicom रस्ता या मार्गे वाहतूक वळविण्यासाठी सदर रस्त्याचा वापर करतेवेळी Vamnicom संस्थेमधील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना विद्यापीठ चौक येथून Vamnicom संस्थेच्या आवारामध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता करणे प्रस्तावित आहे. तसेच, सदर रस्ता करण्यासाठी विद्यापीठ ते स्वामी विवेकानंद शाळेच्या कडेने असलेली ३५ मी लांबीची पत्राची सिमाभिंत काढण्यास परवानगी देण्यात यावी व रस्ता करण्यास परवानगी मिळावी. अशी मागणी PMRDA ने महापालिकेकडे केली आहे.
COMMENTS