टॅक्स आकारणी च्या विरोधात उरुळी देवाची चे नागरिक आक्रमक
: करणार कचरा बंद डेपो आंदोलन
: उरुळी देवाची विकास संघाचा महापालिकेला इशारा
: टॅक्स विभाग प्रमुखांना दिले निवेदन
याबाबत संघाकडून टॅक्स विभाग प्रमुख विलास कानडे यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार सन २०१७ मध्ये ११ गावे पुणे महानगरपालिका हद्दी मध्ये समाविष्ट झाली आहेत. त्यामध्ये उरुळी देवाची हे गाव देखील समाविष्ट झालेले आहे. सदर गाव हे गेली २५ वर्षा पासून कचरा डेपो बाधीत आहेत. सदर गावेसमाविष्ट करण्या अगोदर उरुळी देवाची ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये पुणे मनपाला काही अटी व नियम घालून गाव महानगरपालिके मध्ये समाविष्ट होण्यास परवानगी दिलेली होती. सदर अटी व नियमांचे कोणत्याही प्रकारचे पालन पुणे महानगरपालिकेने आजतागायत केलेले नसुन वेळोवेळी फक्त आश्वासने देऊन फसवणूकच केलेली आहे. सद्यस्थितीमध्ये उरुळी देवाची परिसरात कचरा डेपोमुळे घाणीचे साम्राज्य पसरले असुन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याकडे पुणे महानगरपालिका दुर्लक्ष करीत असुन त्याचा त्रास संपूर्ण गावातील लोकांना सहन करावा लागत आहे. अशी भयानक परिस्थिती गावाची असताना त्याचा कोणताही विचार न करता गावामध्ये अन्याय कारक व जाचक कर आकारणी करण्यात आलेली असुन त्यास ग्रामस्थांचा पुर्णपणे विरोध आहे. कर आकारणी संदर्भात अनेक वेळा निवेदने व पत्र व्यवहार करुन देखील गेली ४ वर्षे महानगरपालिका त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करीत असुन त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. असे ही निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS