बाणेर येथे कोरोनात मृत पावलेल्या व्यक्तींच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले
नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे मार्गदर्शन
पुणे. बाणेर,बालेवाडी,सुस,म्हाळुंगे या परिसरातील ज्या मुला-मुलींचे आई-वडील यांचे कोरोनामुळे निधन झाले. अश्या अनाथ मुला- मुलींचे शैक्षणिक पालकत्व आज दसऱ्याच्या निमित्ताने बाणेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,प्रभाग क्र.९ च्या वतीने आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते समीर चांदेरे यांनी स्विकारले.
परिसरात गरज भासेल तिथे मदत करेन : समीर चांदेरे
दिपक ढेपले यांचे कोरोनामुळे निधन झाले त्यांची मुलगी कु. संध्या ढेपले , मदन गलांडे यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे त्यांचा मुलगा कु. विशाल गलांडे आणि योगेश कदम यांचे निधन झाल्यामुळे त्यांची मुलगी कु. जागृती कदम या तीन विद्यार्थ्यांचा आज प्राथमिक स्वरूपात या वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी मदत म्हणून धनादेश ( चेक ) देण्यात आला.
गेले दीड वर्षाहून अधिक काळापासून आलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्यातील अनेक जणांची कायमची ताटातूट केली त्यात काही जणांचे वडील ,काहींची आई, कुणाचा भाऊ तर कोणाची बहीण , कोणाचा मित्र असे अनेक जण त्यांना सोडून गेले. याचे आपल्या सर्वांनाच अत्यंत दुःख आहे. परंतु आता आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे हेच आता महत्त्वाचे आहे. भविष्यात माझ्या परिसरात अशा प्रकारे गरज असेल तिथे मदत करण्यासाठी मी सदैव व प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे मत युवा नेते समीर चांदेरे यांनी व्यक्त केले
यावेळी समीर चांदेरे, माणिक गांधीले ,नितीन कळमकर, उद्योजक अवधूत लोखंडे, विशाल विधाते ,अमोल भोरे , अर्जुन शिंदे,संजय ताम्हाणे,मनोज बालवडकर, शेखर सायकर, प्रणव कळमकर ,तुकाराम नागरगोजे, प्राजक्ता ताम्हाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS