PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 7572 अर्ज | अर्ज भरण्याचा अंतिम कालावधी 29 डिसेंबर
| मुदत वाढवण्याचा महापालिकेचा विचार नाही
PMC Scholarship for 10th, 12th Student | पुणे | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. याचा कालावधी 29 डिसेंबर ला समाप्त होत आहे. दरम्यान कालपर्यंत महापालिकेकडे 7572 अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी माहिती उपायुक्त नितीन उदास यांनी दिली. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
| Save as Draft मध्ये ठेवला जातोय अर्ज
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज समाज विकास विभागाकडे (PMC Devlopment Department) प्राप्त होत आहेत. तथापि, विभागाच्या असे निदर्शनास आले आहे की अनेक अर्जदार हे दिलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्राची पूर्तता करीत नाही. तसेच अर्ज हा save as draft मध्ये ठेवत आहे. त्यामुळे महापालिकेने सूचना केली आहे कि, अर्जदाराने भरलेला अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवला असेल तर कागदपत्राची पूर्तता त्वरित करून अर्ज submit करावा. तसे न केल्यास सदरचा अर्ज रद्द बातल ठरविण्यात येणार आहे. यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदारावर राहील. (PMC Pune News)
नितीन उदास यांच्या माहितीनुसार आतापर्यंत या दोन्ही योजनांसाठी 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांचे एकूण 7572 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 2797 अर्ज हे save as draft मध्ये ठेवण्यात आले आहेत. दरम्यान उदास यांनी सांगितले कि अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे यावेळी मुदतवाढ दिली जाणार नाही.