Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा

HomeBreaking Newsपुणे

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा

Ganesh Kumar Mule Dec 16, 2022 2:31 PM

Announcement of Higher Education Minister | ‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्यांसाठी राज्य सरकारचा मदतीचा हात |उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
Sanjay Gandhi Niradhar Yojna | संजय गांधी योजनेच्या अडचणी सोडविणार | आमदार सुनील कांबळे यांनी याबाबत लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले
MLA Sunil Tingre | सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार ? | सुनील टिंगरे यांचा सवाल | विधानसभेत आमदारांनी प्रश्‍नाला वाचा फोडली.

भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा

भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) १०० दिवस पुर्ण झाले त्या निमित्ताने भारत जोडो यात्रा समिती, पुणे तर्फे पुण्यात सकाळी ८ ते १० या वेळेत प्रतिकात्मक पदयात्रा (symbolic walk) काढण्यात आली. भारताला जोडणाऱ्या महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले (Gopal Krishna Gokhale) यांच्या पुतळ्याला हार घालून पदयात्रेची सुरूवात करण्यात आली. या पदयात्रेचे प्रास्ताविक करताना ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘भारत जोडो यात्रा देश जोडणारी यात्रा असून ही यात्रा काश्मीर मध्ये पोहोचल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलेले असेल. राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रेचा जो देश हिताचा उद्देश आहे, त्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढीत आहोत.’’

      यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व कायदेतज्ञ ॲड. असिम सरोदे म्हणाले की, ‘‘देशातील विभाजनकारी शक्तींना प्रेम, सत्य, अहिंसेच्या मार्गाने हरविले जाऊ शकते हा या यात्रेचा संदेश आहे. भारत जोडोमुळे अनेक लोक एकत्र आली. काँग्रेस पक्षाला लोक जोडली जातील का? याचा विचार न करता राहुल गांधी आज चालत आहेत यामुळे लोक त्यांच्याकडे आर्कषली जात आहेत. भारत जोडो यात्रेमुळे देशाची लोकशाही मजबूत होईल अशी खात्री राहुलजी गांधी यांना आहे.’’

      यानंतर सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘‘गेल्या आठ वर्षात समाजात, जातीजातीत, धर्माधर्मात व्देष, तेढ निर्माण करून देशातील वातावरण दूषित करण्यात आले  आहे. हे प्रयास आजही सुरू आहे. अशा वातावरणात देशाला धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रात पुन्हा एकत्र बांधण्याचे काम महात्मा गांधींचे आचार विचार करू शकत होते. गेले शंभर दिवस कन्याकुमारी पासून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ते ठळकपणे अधोरेखीत केले आहे. त्यामुळे या यात्रेमुळे म. गांधींनी दाखवलेल्या धर्मनिरपेक्षतेचा मार्ग काँग्रेसला पुन्हा एकदा गवसला आहे.’’

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी म्हणाले की, ‘‘सत्तारूढ हे धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, महिलांचा सन्मान न करणे, महापुरूषांचा वारंवार अपमान करणे, संविधानाचा न पाळण्याचे काम आत्ताचे सत्ताधारी करीत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे ईडीचे मुख्य कार्यकारी असल्यासारखे वागत आहे. या सत्ताधारी पक्षाने लाजलज्जा सोडली आहे म्हणून आम्ही भारत जोडो म्हणत आहोत’’

      महागाई, बेरोजगारीच्या विरोधात निघालेल्या या यात्रेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे असे लोकायतच्या अलका जोशी म्हणाल्या.

      तिरंगा झेंड्याखाली निघालेल्या या पदयात्रेचा समारोप पोलिस ग्राउंड येथे करण्यात आला. संपूर्ण पदयात्रे दरम्यान ‘महागाईशी नाते तोडा, भारत जोडा‘ या व इतर घोषणांनी, रंग दे बसंती‘ , ‘हम होंगे कामयाब‘ या गाण्यांनी फर्ग्युसन कॉलेज रोडवर जोशपूर्ण वातावरण तयार झाले होते.

      समारोप करताना पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी युक्रांदचे संदीप बर्वे, काँग्रसचे दत्ता बहिरट यांनी मनोगत व्यक्त केले.

या पदयात्रेत गोपाळ कृष्ण गोखले यांची नात शर्मिष्ठा खेरे, युवराज शाह, निरज जैन, संगिता तिवारी, रजनी त्रिभुवन, रफिक शेख, जाबुंवत मनोहर, ॲड. अनिल कांकरीया, गोपाळ तिवारी, रविंद्र म्हसकर, संदीप मोकाटे, विनय ढेरे, विजय खळदकर, अजित जाधव, अविनाश गोतारणे, रमेश सोनकांबळे, रविंद्र आरडे, हेमंत राजभोज, जयकुमार ठोंबरे, विनोद रणपिसे, गुलाम खान, चैतन्य पुरदंरे, भगवान कडू, अशोक गेलोत, शिलार रतनगिरी, सुनिल शिंदे, आबा जगताप, सोमेश्वर बालगुडे, प्रसन्न मोरे, राजेंद्र भूतडा, विश्वास दिघे, सुंदरा ओव्हाळ, शर्वरी गोतारणे, रजिया बल्लारी इ. तसेच लोकायत व युक्रांतचे कार्यकर्ते सहभागी होते.