Underground Pune Metro | भुयारी मार्गातून पुणे मेट्रो धावली | पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गामध्ये ट्रेनची चाचणी

HomeपुणेBreaking News

Underground Pune Metro | भुयारी मार्गातून पुणे मेट्रो धावली | पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गामध्ये ट्रेनची चाचणी

Ganesh Kumar Mule Dec 06, 2022 2:16 PM

Union Budget 2025 | अपेक्षेप्रमाणे निराशाजनक अंदाजपत्रक देशाच्या आर्थिक भविष्याबाबत चिंता वाढू लागली – मोहन जोशी
MP Supriya Sule News | पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे – खासदार सुप्रिया सुळे
Union Budget 2025 | सर्वंकष असा आजचा केंद्रीय अर्थसंकल्प | केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया

भुयारी मार्गातून पुणे मेट्रो धावली | पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गामध्ये ट्रेनची चाचणी

पुणे मेट्रोच्या (Pune Metro) पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या 17.4 किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा मार्ग भुयारी आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम दिनांक 4 th June 2022 रोजी टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हर हेड विद्यूत तारा, आणि सिग्नलिंगची कामे वेगाने करण्यात आली. आज दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक आणि त्यानंतर रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक त्यानंतर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी ३ किमीची मेट्रो चाचणी घेण्यात आली. पुणे मेट्रोच्या महत्वाच्या टप्यांपैकी हा तांत्रिक दृष्टया अत्यंत्य महत्वाचा असा टप्पा आहे.(Underground Metro)

पुणे मेट्रोचे ८५ % काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अत्यंत्य वेगाने सुरु आहेत. त्यामुळे दररोज एक-एक माईलस्टोन पार पडत आहेत. भूमिगत मार्गाचे काम तांत्रिक दृष्टया अत्यंत्य आव्हानात्मक असते. बोगदा बनविताना मोठ्याप्रमाणावर निघणारे दगड-गोटे यांना जमीच्या खालून साधारणतः ७० ते ८० फुटांवरून वर आणून त्यांची योग्यरीत्या व योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी लागते . तसेच भुयारी स्थानकांसाठी कट अँड कव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे खोदून खालून बांधकाम करत वर यावे लागते. शिवाजी
नगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हि अत्यंत्य गजबजलेली ठिकाणे असून या भागांतून सामानाची ने- आण करणे अत्यंत्य जिकरीचे आहे. या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या सामानासाठी वाहतुकीची वाहने रात्री १२ ते सकाळी ५ या वेळातच ने आण करत होती. अश्या आव्हानात्मक परिस्थितीत काम करत मेट्रोने रेंजहील ते सिव्हिल कोर्ट यातील भूमिगत मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आणले आहे आणि यामुळेच आमची भूमिगत मेट्रो चाचणी करणे शक्य झाले आहे. आजची चाचणी ठीक ३:20 वाजता रेंजहील डेपो येथून सुरु झाली. रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक अश्या रॅम्प वर
वाटचाल करत ट्रेन स्थानकापर्यंत पोहचली. तेथे ड्रायव्हर ने आपला कक्ष बदलला व मेट्रो ट्रेन रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकातील भूमिगत स्थानकापर्यंत पोहचली.

या चाचणीसाठी गेल्या आठवड्यापासून मेट्रोचे ट्रक, विद्युत, सिग्नलिंग, देखरेख व संचालन असे सर्व विभाग सतत कार्यरत होते. या चाचणीला -30 मिनिटे वेळ लागला व चाचणी नियोजित उद्दिष्टनुसार पार पडली. या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे कि, आजची भूमिगत मेट्रो चाचणी हा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत्य आव्हानात्मक आणि किचकट अशी होती. या चाचणीसाठी पुणे मेट्रोचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत होते. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. पुणे मेट्रोचे ८५% काम पूर्ण झाले असून एक एक टप्पा पार पाडत ती पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. येत्या काही महिन्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते सिव्हिल कोर्ट या मार्गांची कामे पूर करून तो प्रवाश्यांसाठी
खुला करण्यात येईल.