Ti Toilet : PMC : “ती” बस ची महिला बाल कल्याण समितीचे सदस्य करणार पाहणी 

HomeपुणेPMC

Ti Toilet : PMC : “ती” बस ची महिला बाल कल्याण समितीचे सदस्य करणार पाहणी 

Ganesh Kumar Mule Nov 14, 2021 8:56 AM

PMC: Road works: congress: रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आंदोलन करण्याचा काँग्रेस चा इशारा
PMPML : PMC : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोग फरकासाठी 6 कोटी  : स्थायी समितीने दिली मान्यता : मनपा कर्मचाऱ्यांना फरक कधी? 
DA | PMC | सुधारित दराने महागाई भत्त्याचा 4 महिन्याचा फरक मे पेड इन जून वेतनात

“ती” बस ची महिला बाल कल्याण समितीचे सदस्य करणार पाहणी

: त्यानंतरच देखभाल व दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा

पुणे : पुणे शहरामध्ये महिलांकरिता ११ “ती” बस टॉयलेट कार्यरत आहेत.  स्वच्छ “ती” बसटॉयलेटमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन, टॉयलेट सीट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर, जनजागृती विषयक माहिती देण्यासाठी टीव्ही इत्यादी सुविधा आहेत.  ‘ती” बस टॉयलेटची दैनंदिन देखभाल दुरूस्ती व अनुषंगिक कामे ११ महिने करिता प्रायोगिक तत्वावर करणेबाबत साराप्लास्ट यांचे समवेत करारनामा करण्यात आला होता. तो संपला असून नवीन करारनामा करण्याबाबत प्रशासनाकडून महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यावर शुक्रवार च्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार येत्या आठवड्यात समितीचे सदस्य ती बस ची पाहणी करतील. त्यानंतरच सदरच्या प्रस्तावाला मंजुरी द्यायचे अथवा नाही, हे ठरवले जाईल. अशी माहिती समितीच्या अध्यक्ष रुपाली धाडवे यांनी दिली.

: प्रशासनाकडून प्रस्ताव दाखल

सुरुवातीस पीएमपीएमएलच्या वापरात न येणाऱ्या बसेस चे रुपांतर महिलांची गैरसोय होऊ नये याकरिता टॉयलेटमध्ये करण्यात आले. ‘ती” बस टॉयलेटची दैनंदिन देखभाल दुरूस्ती व अनुषंगिक कामे ११ महिने करिता प्रायोगिक तत्वावर करणेबाबत साराप्लास्ट यांचे समवेत करारनामा करण्यात आला होता. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून ठेकेदाराला ( साराप्लास्ट ) कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. सदर करारनामा यामध्ये धुण्याची मशीन, पाण्याची बाटली यांची विक्री करून देखभाल दुरूस्ती करणे इ. बाबींचा समावेश करण्यात आला होता . सदर एजन्सी बरोबरचे करारनामा दि. ५ सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला आहे. तसेच बाणेर येथील “ती” बस येथे वडापाव व समोसा विक्री करण्यात येत असल्या बद्दल आक्षेप घेण्यात आला होता.  २१/०२/२०२१ रोजी ऑनलाईन कोटेशन द्वारे ती बस टॉयलेटची देखभाल व दुरुस्ती करणेकरिता दर मागविण्यात आले असता मे. साराप्लास्ट प्रा. लि. व नारळे कन्सट्रक्शन्स या २ ठेकेदार यांनी अनुक्रमे र रु १८,०००/- व ३,६०,०००/- प्रति बस प्रती महिना याप्रमाणे प्राप्त झाले आहेत. या अनुषंगाने सद्यस्थितीत मे. साराप्लास्ट प्रा. लि. याचे सर्वात कमी दर असून सदरच्या कंपनीकडून देखभाल व दुरुस्ती करून घेणे शक्य होऊ शकते. तथापि  एजन्सी (साराप्लास्ट) यांनी पुढील ५ वर्षाकरीता सी एस आर पद्धतीने पुन्हा काम करण्यास इच्छुक असून सध्या स्थितीत असलेले ११ ती बसेसची देखभाल व दुरुस्ती करून घेणेबाबत उल्लेख करण्यात आला आहे .सदरच्या “ती” बस मध्ये २ कम्पार्टमेंट असून १ कम्पार्टमेंटमध्ये टॉयलेट व वॉश बेसिन असून दुसऱ्या कम्पार्टमेंटमध्ये चहा , कॉफी व कोल्ड्रिंक्म यासारख्या पदार्थांची विक्री करून तसेच जाहिरात, पे अॅण्ड युज, भाडेतत्वावर या मधून उत्पन्न घेऊन त्याद्वारे देखभाल व दुरुस्ती करणेबाबत प्रस्ताव दिला आहे. सध्यस्थितीत देण्यात आलेल्या प्रस्तावात चहा, कॉफी व कोल्ड्रिंक्स यासारख्या पदार्थांची विक्री करण्याबाबतच्या बाबी नव्याने नमूद करण्यात आल्या असून या बाबी यापूर्वीच्या ११ महिन्याच्या करारनामा यामध्ये नमूद करण्यात आल्या नव्हत्या. तसेच महानगरपालिके कडून ठेकेदाराला (साराप्लास्ट) कोणताही मोबदला देण्यात येणार नाही. या प्रस्तावावर  शुक्रवार च्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार येत्या आठवड्यात समितीचे सदस्य ती बस ची पाहणी करतील. त्यानंतरच सदरच्या प्रस्तावाला मंजुरी द्यायचे अथवा नाही, हे ठरवले जाईल.

: सद्य स्थितीत एकूण ११ “ती” बसेस

१) सिंध सोसायटी आय टी आय रोड औंध
२) संभाजी पार्क , जे एम रोड, शिवाजीनगर
३) सिमला ऑफीस, शिवाजीनगर
४) शनिवारवाडा
५) ग्रीन पार्क हॉटेल, बाणेर
६) आनंद नगर , सिंहगड रोड
७) छत्रपती शिवाजी उद्यान, बोपोडी
८) आर टी ओ ऑफीस जवळ,फुले नगर
९) बसस्टॉप, लोहगाव
१०) पोलीस चौकि जवळ, विश्रांत वाडी
११) संविधान चौक, वानवडी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0