Bhartiya Maratha Mahasangh | अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीस स्थगिती देऊन निवडून प्रक्रिया पुन्हा राबवा | भारतीय मराठा महासंघाची मागणी

HomeBreaking Newsपुणे

Bhartiya Maratha Mahasangh | अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीस स्थगिती देऊन निवडून प्रक्रिया पुन्हा राबवा | भारतीय मराठा महासंघाची मागणी

Ganesh Kumar Mule Nov 04, 2022 1:05 PM

Pakistan Economy | पाकिस्तानी रुपयाची भयानक घसरण | एका दिवसात 25 रुपयांनी घट | आता 1 डॉलरच्या तुलनेत ही किंमत
PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | ४०% सवलतीचा पीटी ३ अर्ज महापालिका वेबसाईट वर उपलब्ध 
Mulshi Dam | Pune | Water supply | मुळशी धरणातून पुण्याला पाणी मिळणे राहणार स्वप्न! 

अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीस स्थगिती देऊन निवडून प्रक्रिया पुन्हा राबवा

| भारतीय मराठा महासंघाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीस स्थगिती देऊन निवडून प्रक्रिया पुन्हा राबवावी, अशी मागणी भारतीय मराठा महासंघ कडून करण्यात आली आहे.

भारतीय मराठा महासंघ यांच्या निवेदनानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीच्या गलथान कारभाराच्या विरोधात तक्रार करीत आहोत की आपण विद्यापिठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांची निवडणूक घेत असताना अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे गरजेचे होते परंतु आपण अशी कोणतीही पत्रकार परिषद न घेता तसेच नवीन पदवीधर मतदारांना आणि निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांना अंधारात ठेवून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच आपण निवडणूक कार्यक्रमाचे परिपत्रक जारी करत आहात परंतु रोज किती मतदार संकेतस्थळाला भेट देत असतील यात शंका आहे आपण कोणतीही पत्रकार परिषद न घेताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असल्यामुळे पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नवीन पदवीधर मतदारांपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मतदारांपर्यंत पोहोचली आहे का यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. यामुळे आम्ही आपणाकडे अशी मागणी करत आहोत की
1) नवीन पदवीधरांना पदवीधर मतदार म्हणून नोंदणीसाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी.
2)पुणे पदवीधर मतदार संघातील पुणे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या मतदारांना या आधिसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा.
3) दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देऊन निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्यात यावे.

वरील सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार न केल्यास 20 नोव्हेंबर रोजी विविध मतदान केंद्रांवर भारतीय मराठा महासंघाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलने केले जातील असा इशारा भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविराज काळे यांनी निवडणूक अधिकारी प्रफुल्ल पवार यांना दिला . यावेळी उपस्थित उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश कानवटे, प्रमुख संघटक निरज सुतार,अजय चव्हाण, रविंद्र जगताप उपस्थित होते.