Pune Property Tax | मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव अन्याय्य, अवाजवी आणि अनावश्यक | विवेक वेलणकर | शुक्रवारी होणार करवाढ बाबत निर्णय

Homeadministrative

Pune Property Tax | मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव अन्याय्य, अवाजवी आणि अनावश्यक | विवेक वेलणकर | शुक्रवारी होणार करवाढ बाबत निर्णय

Ganesh Kumar Mule Feb 02, 2026 7:11 PM

PMC PT 3 Application form | प्रॉपर्टी टॅक्स विभाग घेणार अतिरिक्त 500 कर्मचारी | शहरातील 4 लाख मिळकतींचा केला जाणार सर्वे! 
Relief to the citizens of 34 included villages! Important decision of the state government!
 PT-3 application deadline extended till 15th August |  PMC took important decisions regarding 40% discount

Pune Property Tax | मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव अन्याय्य, अवाजवी आणि अनावश्यक | विवेक वेलणकर

 

 

Vivek Velankar – (The Karbhari News Service) – महापालिका प्रशासनाने पुढील वर्षासाठी मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जो प्रामाणिकपणे वेळेत कर भरणाऱ्या लाखो नागरिकांवर अन्यायकारक आहे. अशी टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. दरम्यान आजच्या स्थायी समिती समोर करवाढ बाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र समितीची बैठक आज होऊ शकली नाही. ही बैठक आता शुकवारी होणार आहे. त्यावेळी याबाबत निर्णय होईल. (PMC Property tax Department)

वेलणकर यांनी म्हटले आहे कि, ज्या प्रशासनाला एक कोटीपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकी असलेल्या फक्त १६६७ मालमत्ता धारकांकडून तब्बल ७७३७ कोटी रुपयांची वसुली करण्यात अपयश आले आहे, ज्यापैकी ३५५ कोटी रुपयांची थकबाकी तर सरकारी आणि निमसरकारी संस्थांची आहे, त्या प्रशासनाने प्रामाणिकपणे वेळेत कर भरणाऱ्या लाखो नागरिकांकडून फक्त २५० कोटी रुपयांच्या वाढीव करासाठी १०% करवाढीचा बोजा टाकावा हे अतर्क्य आहे. थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी अभय योजनेच्या पायघड्या घालून सुद्धा दोन महिन्यांत वसुली झाली नाही; म्हणून या अभय योजनेला मुदतवाढ देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली असताना महसूल वाढीसाठी अत्यंत सोपा पर्याय निवडून निमूटपणे वेळेवर कर भरणाऱ्या नागरीकांवर करवाढीचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे. असेही वेलणकर यांनी म्हटले आहे.
—–

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: