Non Communicable Diseases | व्यायाम करा आणि आजारा पासून दूर राहा | मला कर्करोग होऊ शकत नाही म्हणून गाफील राहू नका
| मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या आजारां आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम
PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत (PMC Health Department) शासनाच्या मार्गदर्शक सूचनांन्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून असंसर्गजन्य आजार एनसीडी (Noncommunicable Diseases Data Portal) कार्यक्रम राबवला जात आहे. यात प्रामुख्याने मधुमेग (Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), कर्करोग (Oral Cancer, Breast Cancer, Cervical Cancer) अशा रोगांचा समावेश आहे. यात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तसेच याबाबत जनजागृती केली जात आहे. या वर्षात १३ लाखाहून अधिक लोकांची माहिती पोर्टल वर भरण्यात आली आहे. अशी माहिती सहायक आरोग अधिकारी डॉ वैशाली जाधव (Dr Vaishali Jadhav PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
दरम्यान आरोग्य विभागाने या आजारांना दूर ठेवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार विभागाकडून लोकामध्ये प्रसार केला जात आहे.
– नियमीत व्यायाम करून हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह अशा आजारावर नियंत्रण ठेवता येते. तसेच हे आजार असले तरी व्यायाम केल्याने दूर होतात. कारण व्यायाम केल्याने हृदयाच्या रक्त वाहिन्याच्या क्षमतेत वाढ होते. हृदयाच्या रक्त पुरवठ्यात वाढ होते. रक्तातील साखरेचा योग्य प्रकारे वापर होतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो. शरीरातील उर्जेचा वापर वाढवून वजन नियंत्रणात राहते.
– रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सूचना
वजन नियंत्रित ठेवा. दुपारचे जेवण झाल्यावर शतपावली करा. लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर कराव. साखरेचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ (मिठाई, पेय पदार्थ) सेवन करून नका. खरट पदार्थ उदा चिप्स, पापड यांचे सेवन करू नका. जंक आणि तळलेल्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळा
– मला कर्करोग होऊ शकत नाही म्हणून गाफिल राहू नका
आरोग्य विभागाने म्हटले आहे की, मला कर्करोग होऊ शकत नाही म्हणून गाफिल राहू नका. भारतात दरवर्षी १५ लाख कर्करोगाचे रुग्ण आढळत आहेत. दर आठ मिनिटाला एका महिलेचा मृत्यू गर्भाशय मुखाच्या कर्करोगाने होतो. स्तनाचा कर्करोग निदान झालेल्या २ महिलापैकी एका महिलेचा मृत्यू भारतात होतो. भारतात एकूण कर्करोग रुग्णापैकी सर्वाधिक रुग्ण १६% हे मुखाच्या कर्करोगाचे आहेत. दररोज २५०० रुग्ण हे तंबाखूमुळे झालेल्या कर्करोगा मुळे भारतात मरण पावतात.
आरोग्य विभागाने म्हटले आहे की, प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास कर्करोगावर उपचार शक्य आहे. कर्करोगाचा धोका ओळखा आणि पुणे महापालिकेच्या आरोग्य संस्थेत आपली तपासणी करून घ्या.
COMMENTS