प्रशासक राजवट चालू झाल्यापासून विषय समित्यांचे ठराव संकेतस्थळावर उपलब्ध होत नाहीत
: ठराव पालिका संकेतस्थळवर प्रसिध्द करण्याची मागणी
पुणे : महापलिकेत प्रशासक राजवट चालू झाल्यापासून विषय समित्यांचे ठराव संकेतस्थळावर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हे ठराव पालिका संकेतस्थळवर प्रसिध्द करण्याची मागणी माजी स्वीकृत सभासद अभिजित बारवकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
बारवकर यांच्या निवेदनानुसार महापालिका मुख्य सभा विसर्जित झाल्यापासून प्रशासन राजवट आल्यापासून दिनांक १३/४/२०२२ पासून पुणे महानगरपालिका चे संकेतस्थळवर मुख्य सभा , स्थायी व इतर समिती चे एकही ठराव उपलब्ध करण्यात आलेले नाही . सदरची गोष्ट ही लोकाभिमुख कारभारा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .व तसेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 (1) (क) आणि कलम 4 (1) (ख) तसेच कलम 5(1) व 5(2) आजही अंमलबजावणी काटेकोरपणे केलेली दिसत नाही.
विनंती आहे की , मुख्य सभा , स्थायी व इतर समितीचे ठराव पालिका संकेतस्थळवर प्रसिध्द करण्यात यावेत.
COMMENTS