शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत शासकीय योजनांचे कार्ड वाटप
: शहर चिटणीस अभिजित आणि दिपाली बारवकर यांचा उपक्रम
पुणे : लोकनेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तपोभूमी मैदान, दत्तवाडी, पुणे येथे विविध शासकीय योजनांच्या कार्ड वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये प्रामुख्याने शहरी गरीब योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड वाटप डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना मीटर, याचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर चिटणीस अभिजित बारवकर व दिपाली अभिजित बारवकर यांनी विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे कार्ड वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पवार साहेबांनी नेहमीच लोकसेवेला प्राधान्य दिलं आहे, आज हा लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल साहेबांनाही निश्चितच आपल्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटेल हा विश्वास व्यक्त करतो.
यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर, नगरसेविका अश्विनी कदम, नगरसेविका प्रिया गदादे, पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम, कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलवडे, शहर प्रसिद्धीप्रमुख अमोघ ढमाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश हांडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
COMMENTS