Pune PMC News | पुणे महापालिकेच्या अँटीव्हायरस खरेदीसाठी ६९ लाखांचा खर्च; प्रस्ताव स्थायी समितीसमोर

पुणे महापालिकेच्या अँटीव्हायरस खरेदीसाठी ६९ लाखांचा प्रस्ताव

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या अँटीव्हायरस खरेदीसाठी ६९ लाखांचा खर्च; प्रस्ताव स्थायी समितीसमोर

Ganesh Kumar Mule Nov 27, 2026 9:21 AM

PMPML Audit | पीएमपीएमएलच्या मालकीच्या बसेसचा प्रती किमी संचलन खर्च १७५ रु पेक्षा अधिक | लेखापरीक्षणात बाब झाली उघड  | भारतात कुठेही हा खर्च ७५ रु पेक्षा अधिक नाही 
PMC Rani Laxmibai Scheme |  राणी लक्ष्मीबाई योजना अंतर्गत १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन | नगरसेवक देखील सुचवू शकणार उपक्रम 
PMC Recruitment Portal | महापालिकेच्या सर्व प्रकारच्या भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल अंतिम टप्प्यात | बनावट भरती रॅकेटविरोधात कठोर कारवाईचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या अँटीव्हायरस खरेदीसाठी ६९ लाखांचा खर्च; प्रस्ताव  स्थायी समितीसमोर

|  संगणक आणि सर्व्हरच्या सुरक्षेसाठी दोन वर्षांचे अँटीव्हायरस लायसन्स; भारती एअरटेलची सर्वात कमी दराची निविदा

 

PMC Standing Committee | The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयासह सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि संपर्क कार्यालयांमधील संगणक व सर्व्हरची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी अँटीव्हायरस लायसन्स सॉफ्टवेअर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी दोन वर्षांच्या कालावधीकरिता सॉफ्टवेअर खरेदी आणि देखभाल-दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. (PMC IT Department)

या खरेदीसाठी १८ टक्के जीएसटीसह एकूण खर्च ६९ लाख १७ हजार ४०८ रुपये इतका होणार आहे. सर्वात कमी दराची निविदा भारती एअरटेल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने सादर केली आहे.

|  संगणक आणि सर्व्हरच्या सुरक्षेसाठी अँटीव्हायरस आवश्यक

 महापालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयातील तसेच सर्व क्षेत्रीय आणि संपर्क कार्यालयांतील संगणकांवर प्रशासकीय कामकाज केले जाते. हे सर्व संगणक मुख्य इमारतीतील सर्व्हर रूमशी नेटवर्कद्वारे जोडलेले आहेत.

इंटरनेट, पेनड्राइव्ह, विविध प्रकारचे मीडिया, ऑनलाइन ॲप्लिकेशन्स किंवा माहिती डाउनलोड करताना संगणकांमध्ये व्हायरस येण्याची शक्यता असते. त्यामुळे संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम हँग होणे, कार्यक्षमता कमी होणे, फाइल्स नष्ट होणे किंवा अवाचनीय होणे तसेच संगणक आणि सर्व्हरवरील महत्त्वाचा डेटा करप्ट होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

महापालिकेचे बहुतांश प्रशासकीय कामकाज संगणकावर आधारित असल्याने डेटा सुरक्षितता राखण्यासाठी सर्व संगणक आणि सर्व्हरसाठी अँटीव्हायरस लायसन्स खरेदी करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.

| निविदा प्रक्रियेत पाच कंपन्यांचा सहभाग

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर खरेदी आणि दोन वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी बी-२ पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदेत पाच कंपन्यांनी सहभाग घेतला.

निविदाधारकांच्या ‘अ’ पाकिटाची छाननी केल्यानंतर तीन कंपन्या अपात्र ठरल्या. त्यामध्ये प्रायटेक सोल्युशन्स (पुणे) प्रा. लि., मिनिटेक सिस्टीम्स (इंडिया) प्रा. लि. आणि केजेएम ग्रुप सिस्टिम सोल्युशन्स या कंपन्यांचा समावेश आहे.

 

|  भारती एअरटेलची सर्वात कमी दराची निविदा

पात्र कंपन्यांनी सादर केलेल्या दरांचा तुलनात्मक तक्ता पुढीलप्रमाणे आहे.

| कंपनी | निविदेतील दर (जीएसटी वगळून) |

| भारती एअरटेल सर्व्हिसेस लिमिटेड | ₹५८,६२,२१० |
| पेस बिझनेस मशीन्स प्रा. लि. | ₹१, ६८, ३०, ००० |

तुलनात्मक तक्त्यानुसार भारती एअरटेल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी सर्वात कमी दराची म्हणजेच L1 निविदाधारक ठरली आहे. त्यामुळे या कंपनीकडून दोन वर्षांसाठी अँटीव्हायरस लायसन्स सॉफ्टवेअर खरेदी आणि देखभाल-दुरुस्ती करून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

|  जीएसटीसह ६९ लाख १७ हजारांचा खर्च

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर खरेदी आणि दोन वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ५८ लाख ६२ हजार २१० रुपये खर्च अपेक्षित आहे. यावर १८ टक्के जीएसटी अर्थात १० लाख ५५ हजार १९८ रुपये आकारण्यात येणार आहेत.

त्यामुळे जीएसटीसह एकूण खर्च ६९ लाख १७ हजार ४०८ रुपये होणार आहे. या खर्चासाठी संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये निधी उपलब्ध असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेच्या संगणक आणि सर्व्हरवरील महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या खरेदीसाठी होणाऱ्या खर्चाला स्थायी समिती आजच्या बैठकीत मंजुरी देते का, याकडे लक्ष लागले आहे.
:::

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: