PMC Ganeshotsav 2026 | पुणे मनपाच्या ३८ घाटांवर ६.७७ लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पाठीमागे स्वच्छता करताना महापालिका कर्मचारी.

Homeadministrative

PMC Ganeshotsav 2026 | पुणे मनपाच्या ३८ घाटांवर ६.७७ लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन

Ganesh Kumar Mule Sep 26, 2026 9:04 PM

Air Quality Index | इलेक्ट्रिक वाहने आणि BSVI इंजिन असलेल्या वाहनांमुळे पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारली | इलेक्ट्रिक वाहनांत 4.28 पटीने वाढ 
PMC Illegal Construction Action | पाषाण परिसरात महापालिका बांधकाम विभागाकडून कारवाई
Naval Kishor Ram IAS | पालखी मार्गाची उर्वरीत कामे पुढील ३ दिवसांत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त यांचे आदेश  

PMC Ganeshotsav 2026 | पुणे मनपाच्या ३८ घाटांवर ६.७७ लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन

| ९ लाख किलोहून अधिक कचरा संकलित

 

Pune News – (The Karbhari News Service) –  सालाबादाप्रमाणे यंदाही १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी नदी, तलाव यांसारख्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन न करता, महापालिकेने पुरवलेल्या सोयीसुविधांचा वापर करून विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने या संपूर्ण कालावधीतील नियोजनाचा तपशीलवार अहवाल सादर केला आहे. (PMC Solid Waste Management Department)

३८ घाट, ५८ हौद, ८१२ लोखंडी टाक्या

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ३८ घाटांची सोय करण्यात आली होती. या ३८ ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकूण ५८ बांधलेले हौद, ३०५ ठिकाणी ८१२ लोखंडी टाक्या तसेच २२४ मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. शाडूमातीच्या गणेशमूर्ती अथवा शाडूमाती संकलनासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ४५ ठिकाणी स्वतंत्र संकलन केंद्रेही उभारण्यात आली होती.

निर्माल्य संकलनासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २६७ ठिकाणी एकूण ३५८ निर्माल्य कलश/कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले होते.

४,६४८ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ, १,६७० वाहने

गणेशोत्सव २०२६ च्या संपूर्ण नियोजनासाठी महापालिकेचे एकूण १६ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, १६१ आरोग्य निरीक्षक, २९२ मोकादम तसेच एकूण ४,१७९ कायम सफाई सेवक असे एकूण मनुष्यबळ कार्यरत होते. यासोबतच १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार एकूण १,६७० वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती.

वाघोली येथील खाणीत पुनर्विसर्जन

बांधलेले हौद व लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यासाठी वाघोली येथील खाणीची विशेष सोय करण्यात आली होती. आवश्यक नियोजन करून १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत येणाऱ्या गणेशमूर्तींचे या खाणीत सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करण्यात आले.

मोफत सार्वजनिक स्वच्छतागृहे

क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरातील सर्व सार्वजनिक सशुल्क/सुलभ स्वच्छतागृहे नागरिक व पर्यटकांसाठी १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती, आणि याकरिता संबंधित केअरटेकरला वापरकर्त्यांकडून शुल्क न आकारण्याविषयी आदेशित करण्यात आले होते.

एकूण ६,७७,०५७ गणेशमूर्तींचे विसर्जन

१४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बांधलेल्या हौदांत १,०९,४७९ गणेशमूर्ती, लोखंडी टाक्यांत ३,९४,३४९ गणेशमूर्ती तसेच १,७३,२२९ गणेशमूर्ती संकलन केंद्रांमार्फत असे मिळून एकूण ६,७७,०५७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यासोबतच ७,१५,०५९ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.

९,१८,५३७ किलो कचरा संकलित

१५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत एकूण ९,१८,५३७ किलो कचरा संकलित करण्यात आला, ज्यामध्ये पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले :

ओला कचरा : ५,४६,३५४ किलो
सुका कचरा : ३,७२,१८४ किलो
डेकोरेशन साहित्य : १८,९१० किलो
चपला/बूट : २,१५३ किलो

दैनंदिन स्वच्छता मोहीम सुरूच

क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, मोकळे भूखंड, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे आणि सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छतेविषयक कामकाज दैनंदिन स्वरूपात करण्यात येत असून, विसर्जन मिरवणुकांच्या मार्गांची स्वच्छता करण्यासाठी आवश्यकतेनुसार सफाई सेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेचे कामकाज तसेच कृत्रिम हौदांच्या स्वच्छतेचे कामकाजही अद्याप सुरू आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: